TRENDING:

हॉटेलमध्ये ठेवलेले शॅम्पू-कंडिशनर वापरता का? यामागचं धक्कादायक सत्य उघड

Last Updated:

अनेक वेळा अनेक लोकांनी फ्लाइट आणि हॉटेल्सची गलिच्छ रहस्ये उघड केली आहेत, आज या व्यक्तीने देखील असंच सत्य उघड केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 1 ऑगस्ट : सुट्टीसाठी कुठेही फिरायला गेलं की हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागतो. लोक आपल्याला परवडेल त्या किंमतीत रुम भाड्याने घेऊन रहातात. प्रत्येक हॉटेल हे वेगवेगळ्या सुविधा आपल्या गेस्टला देत असतात. मग लोक देखील आपल्याला मिळालेल्या सर्व वस्तूंचा पुरेपूर वापर करतात. काही हॉटेलच्या टॉयलेटमध्ये शॅम्पू-कंडिशनर ठेवलेले असतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अनेक लोक याचा वापर करतात, तर काही लोक याला घरी देखील घेऊन येतात. तुम्ही देखील असं करत असाल तर थांबा. याचं सत्य कळताच तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

एका हॉटेल मॅनेजरने (@travelinghotelmanager) त्याच्या सोशल मीडियावर याचा खुलासा केला. त्यांनी अशा गोष्टींबद्दल सांगितले आहे की ज्यांना तुम्ही हॉटेलमध्ये राहताना वापरू नये.

तरुण दिसण्यासाठी तरुणी करते किळसवाणा प्रकार, ऐकून येईल उलटी

advertisement

अनेक वेळा अनेक लोकांनी फ्लाइट आणि हॉटेल्सची गलिच्छ रहस्ये उघड केली आहेत, आज या व्यक्तीने देखील असंच सत्य उघड केलं आहे.

TikTok वर हॉटेल मॅनेजर सांगतो की तुम्ही हॉटेलमध्ये दिलेले शाम्पू, कंडिशनर आणि बॉडी वॉश टाळावे. पुढे त्याने सांगितले की, माझ्यावर विश्वास ठेव, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल.

बाटली उघडून दाखवलेलं वास्तव

advertisement

मॅनेजर म्हणाले, रूम घेतल्यावर आम्ही अनेकदा चेक करतो. जेव्हा आपण बाथरूममध्ये जातो तेव्हा आपल्याला तिथे शॅम्पू, कंडिशन आणि बॉडी वॉश नक्कीच मिळते.

परंतू नेहमी शाम्पूच्या बाटलीचं वरचं झाकण उघडून ते सुनिच्छीत केलं पाहिजे. वास्तविक, केसांचा रंग आणि ब्लीच बाटलीत ठेवले होते. जर तुम्ही चुकून त्यांचा वापर केला तर काय होईल याची कल्पना करा. म्हणूनच हॉटेल मॅनेजरने सुचवले की तुम्ही नेहमी स्वतःचे लहान आकाराचे शॅम्पू, कंडिशनर आणि बॉडी वॉश बाळगा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कॉलेज सांभाळत व्यवसायाची वाट, सलोनीचा चीजकेक स्टॉल हिट, महिन्याची कमाई तर पाहाच
सर्व पहा

तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोक सोबत शॅम्पू-कंडिशनर घेऊन जातात, पण ते फक्त हॉटेलनं दिलेलं वापरतात. पण असं करु नका आणि जर तुम्ही तुमचा स्वतःचा घेतला नसेल, तर फ्रंट डेस्कवर जा आणि एक नवीन सेट, अगदी एक मिनी सेट मागवा.

मराठी बातम्या/Viral/
हॉटेलमध्ये ठेवलेले शॅम्पू-कंडिशनर वापरता का? यामागचं धक्कादायक सत्य उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल