चालण्यावरही बंदी
कथितपणे, हे पोस्टर बेंगळुरूमधील इंदिरानगर पार्कचे आहे, जे एका युजरने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पार्कमधील पोस्टरमध्ये अनेक नियम लिहिलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जॉगिंगला बंदी आहे. इतर नियमांबद्दल बोलायचं झालं, तर कोणत्याही प्रकारच्या गेमिंग ऍक्टिव्हिटीवर बंदी घालण्यात आली आहे. सर्वात आश्चर्यकारक नियम म्हणजे लोक फक्त एकाच दिशेने चालू शकतात. व्हायरल बोर्डवर सूचना आहे की लोक पार्कमध्ये फक्त घड्याळाच्या दिशेने (clockwise) चालू शकतात.
advertisement
नेटकरी देताहेत प्रतिक्रिया
प्रकरण उघडकीस आल्यानंतर लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने आश्चर्याने लिहिलं, "तुम्ही विनोद करत आहात, बरोबर? इंदिरानगर पार्कमध्ये जॉगिंग नाही? पुढे काय होईल? पार्कमध्ये वेस्टर्न कपडे नाहीत? पार्कमध्ये जॉगिंग करण्यात काय अडचण आहे?" तर दुसऱ्या युजरने लिहिलं, "बंगलोरमध्ये सार्वजनिक जागांची कमतरता ही एक समस्या आहे, पण दुसरी समस्या ज्याबद्दल बोललं जात नाही ती म्हणजे या प्रकारची नैतिक पोलिसिंग." आणखी एका युजरने लिहिलं, "आश्चर्य आहे, जर कोणी अचानक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जॉगिंग करायला लागलं तर काय होईल?"
हे ही वाचा : आईला सोबत घेऊन होणाऱ्या नवऱ्याने केलं 'हे' काम, मुलीला आला राग, लग्न होण्याआधीच तोडलं नातं!
हे ही वाचा : आरामात झोपलेल्या वाघाला कुत्र्याने दिलं आव्हान, पुढे जे घडलं, ते पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का! पहा VIDEO
