TRENDING:

Jugaad Video : स्विचबोर्डला कांदा-टोमॅटो लावताच झाली कमाल, पाहताच तुम्हीही कराल उपाय

Last Updated:

कांदा-टोमॅटोचा असा अनोखा वापर तुम्ही ज्याचा विचारही केला नसेल. स्विचबोर्डवर लावल्यानंतर असा परिणाम की पाहतच राहाल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कांदा-टोमॅटो आपण सामान्यपणे जेवणात वापरतो. आतापर्यंत कांदा-टोमॅटोपासून तुम्ही बरेच पदार्थ बनवले असतील. पण कधी स्विचबोर्डला कांदे-टोमॅटो लावून पाहिले आहेत का? वाचून आश्चर्य वाटेल पण खरंच हा किचन जुगाड खूप फायदेशीर आहे. स्विचबोर्डला कांदे-टोमॅटो लावल्यानंतर काय कमाल होते ते तुम्ही एकदा पाहाच.
किचन जुगाड
किचन जुगाड
advertisement

आजी-आई आणि अशा बऱ्याच गृहिणींकडे कित्येक घरगुती टीप्स असतात. अशाच काही गृहिणींनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ. ज्यात त्यांनी कांदा-टोमॅटोचा हा अनोखा वापर करून दाखवला आहे. आजवर असा वापर तुम्ही कधीच पाहिला नसेल. त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर हे व्हिडीओ शेअर केले आहेत.

काय करायचं आहे?

पहिल्यांदा पाहूया कांद्याचा स्विचबोर्डवर वापर. कांद्याचा थोडासा भाग कापून घ्या किंवा कांद्याची साल, कांद्याचा वरचा भाग घ्या आणि तो स्विचबोर्डवर चोळा. त्यानंतर कोरड्या कपड्याने स्विचबोर्ड पुसून घ्या.

advertisement

Jugaad Video : दिवाळीची साफसफाई करण्याआधी झाडूवर चप्पल मारा; चकीत करणारा परिणाम

तुम्हाला कांद्याचा वास सहन होत नसेल तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता. टोमॅटोचाही वरचा देठाकडील भाग तसा आपण सामान्यपणे फेकून देतो. पण हाच भाग फेकून न देता तो तुमच्या स्विचबोर्डवर चोळा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या.

फायदा काय?

advertisement

आता व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्विचबोर्ड पाहाल तर कांदा-टोमॅटो लावण्याआधी त्यावर डाग होते पण कांदा-टोमॅटो लावल्यानंतर मात्र ते डाग गायब झाले आणि तो चकचकीत झाला आहे.

स्विचबोर्डवर आपले हात लागून किंवा धूळ लागून तो खराब होतो. त्याच्यावर डाग दिसू लागतात. अशावेळी तुम्ही जर तो नुसत्या पाण्याने स्वच्छ करायला गेलात तर होत नाही. शिवाय शॉक लागण्याचीही भीती असते. त्यामुळे स्विचबोर्ड स्वच्छ करण्याचा या सर्वात सोपा असा उपाय आहे. दिवाळीच्या साफसफाई झटपट स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला हा उपाय फायदेशीर ठरेल.

advertisement

Jugaad Video : दिवाळीची साफसफाई करताना पंख्याला लावा पीठ आणि पाहा काय कमाल होते

Indian Vlogger Pinki युट्यूब चॅनेलवर हे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा होता ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

advertisement

(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video : स्विचबोर्डला कांदा-टोमॅटो लावताच झाली कमाल, पाहताच तुम्हीही कराल उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल