Jugaad Video : दिवाळीची साफसफाई करताना पंख्याला लावा पीठ आणि पाहा काय कमाल होते
- Published by:Priya Lad
Last Updated:
चपातीच्या पिठाचा पंख्यावर अशा अनोख्या वापराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली : उन्हाळा सुरू झाला की पंख्याचा वापर जास्त वाढतो. पण पंखा सुरू करण्याआधी एकदा त्याला चपातीचं पीठ नक्की लावून पाहा. पंख्याला चपातीचं पीठ... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण याचा फायदा असा की तुम्ही विचारही केला नसेल. हा उपाय केल्यानंतर पुढील काही महिने तुमची मोठ्या त्रासातून सुटका होईल. या जबरदस्त अशा किचन जुगाड चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
आतापर्यंत गव्हाच्या पिठापासून तुम्ही बरेच पदार्थ बनवले असतील. चपाती, पुरी, पराठे आणि बरंच काही… पण तुम्ही हे पीठ पंख्याला लावून पाहिलं आहे का? गव्हाचं चपातीसाठी मळलेलं पीठ एकदा पंख्याला लावून पाहा आणि कमाल पाहा. पंख्याला चपातीचं पीठ लावल्याने असा परिणाम पाहायला मिळाला की तुम्ही विचारही केला नसेल. यामुळे तुमचं मोठं काम हलकं, सोपं होईल. आता तुम्हाला नेमकं करायचं काय आहे ते पाहुयात.
advertisement
करायचं काय?
सामान्यपणे आपण चपातीचं पीठ मळण्यासाठी तेल आणि पाण्याचा वापर करतो. पण या जुगाडासाठी तुम्हाला फक्त तेलातच हे पीठ मळायचं आहे. एका भांड्यात थोडं चपातीचं पीठ घ्या. त्यात तेल टाका आणि तेलात हे पीठ मळा. थोडंही पाणी यात वापरायचं नाही. आता या पिठाचा जसा आपण चपातीसाठी गोळा करतो तसा गोळा करून घ्या आणि तो पंख्याला लावा. आता पंख्याला पीठ लावायचं म्हणजे नक्की काय करायचं. तर हा गोळा घेऊन तुम्ही तो संपूर्ण पंख्यावर फिरवायचा आहे.
advertisement
पंख्याला चपातीचं पीठ लावण्याचा फायदा काय?
आता यावर तुम्हाला पंख्याला लागलेली धूळ चिकटलेली दिसेल. हा उपाय म्हणजे पंखा साफ करण्याचा सोपा असा उपाय आहे. पंख्यावर धूळ साचते, पंखा चिकट होतो. कापडाने तुम्ही हे स्वच्छ करायला गेलात तर खूप मेहनत लागते. सहजासहजी ते निघत नाही. पण पीठ आणि तेलाच्या मदतीने पंखा सहज स्वच्छ होतो. गृहिणीने व्हिडीओत सांगितल्यानुसार, यानंतर तुम्हाला किमात पाच-सहा महिने पंखा स्वच्छ करण्याची गरजच पडणार नाही.
advertisement
TeasteofHome युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही पंखा स्वच्छ करण्यासाठी काय जुगाड वापरता तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
October 05, 2024 2:14 PM IST