Rohit Sharma : फिल्डिंग कर पागल है क्या..! टॉस सोडून भेटायला आलेल्या सूर्याला हिटमॅनने काय दिला सल्ला? संभाषणाचा Video आला समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma Gives Advice to Suryakumar yadav : रोहितला पाहताच सूर्यकुमार धावत धावत त्याच्याजवळ गेला अन् त्याची भेट घेतली. त्यावेळी त्याने हिटमॅनला सल्ला विचारला.
Rohit Sharma Suryakumar Yadav Video : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील तिसरा सामना पार पडला. भारत आणि युएसए (IND vs USA) यांच्यात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला सूर्यकुमार यादव... सूर्याने आपल्या फलातून कामगिरीच्या जोरावर विजय मिळून दिला. मात्र, सामन्याआधी सूर्या प्रेशरमध्ये असल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच त्याने रोहित शर्माची धावती भेट घेतली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
बॅटिंग घेऊ की बॉलिंग घेऊ?
रोहित शर्मा मैदान सोडून जात असताना सूर्या टॉससाठी थांबला होता. रोहितला पाहताच सूर्यकुमार धावत धावत त्याच्याजवळ गेला अन् त्याची भेट घेतली. त्यावेळी त्याने हिटमॅनला सल्ला विचारला. बॅटिंग घेऊ की बॉलिंग घेऊ? असा सवाल सूर्याने रोहितला विचारला. त्यावर रोहितने एका वाक्यात उत्तर दिलं. फिल्डिंग कर पागल है क्या..! त्यानंतर कॅप्टन तू आहे.. मी नाही, असं रोहित पुटपुटताना दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिसतोय.
advertisement
ICC posted this beautiful video of Rohit Sharma. Oh I am loving these, keep it coming pic.twitter.com/5YwYE67RTs
— Kusha Sharma (@Kushacritic) February 8, 2026
सूर्याच्या नरजेला हिटमॅन दिसताच...
रोहित शर्मा यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बासिटर आहे. वानखेडेवर रोहित शर्माच्या हस्ते ट्रॉफी मैदानात आणण्यात आली होती. त्यावेळी रोहित शर्मा काळ्या रंगाच्या कपड्यात दिसून आला. ट्रॉफी मैदानात ठेवल्यानंतर रोहितने मैदानातील खेळाडूंची भेट घेतली. यामध्ये त्याने शिवम दुबे याची गळाभेट घेतली तर समालोचन करत असलेल्या युझी चहलची देखील गाठ घेतली. त्यानतंर सूर्याच्या नरजेला हिटमॅन दिसताच तो रोहितकडे पळत आला होता.
advertisement
प्रेक्षकांनी एकच कल्ला केला
दरम्यान, वानखेडेवर ओपनिंग सेरेमनीचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अनेक कलाकार आणि खेळाडू उपस्थित होते. त्याचबरोबर अमेरिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. रोहितने जेव्हा मैदानात पाऊल ठेवलं, त्यावेळी प्रेक्षकांनी एकच कल्ला केला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 12:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : फिल्डिंग कर पागल है क्या..! टॉस सोडून भेटायला आलेल्या सूर्याला हिटमॅनने काय दिला सल्ला? संभाषणाचा Video आला समोर










