सीमा हैदर ही भारतात आणि सचिन नावाच्या तरुणाशी लग्न केलं. सीमा हैदर ही भारतात शरणार्थी म्हणून राहत आहे. तिचा अर्ज हा राष्ट्रपती कार्यालयाकडे प्रलंबित आहे. अशातच केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला असून ४८ तासांमध्ये आपल्या देशात परत जाण्याचे आदेश दिले आहे. पण सीमाला पाकिस्तानला जाणे अनिवार्य ठरणार नाही. केंद्र सरकारचा निर्णय हा सीमा हैदरला लागू होत नाही. तिचं प्रकरण हे वेगळं आहे. या प्रकरणाचा तिच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असं तिचे वकील सिंह यांनी स्पष्ट केलं.
advertisement
सीमाने सचिन मीना नावाच्या तरुणाशी केलं लग्न
सीमा हैदर ही मुळ पाकिस्तानात राहणारी आहे. पबजी खेळता खेळता ती सचिनच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी ती भारतात आली. ग्रेटर नोयडामधील रबूपुरा भागात राहणाऱ्या सचिन मीनासोबत सीमाने संसार थाटला आहे. तिने भारतात येण्याआधी पहिली नवरा गुलाम हैदरला सोडचिठ्ठी दिली. चार मुलांची आई असलेली सीमा ही नेपाळ मार्गे भारतात आली. तिचा वकील एपी सिंह याच्या मदतीने सचिन मीणासोबत तिने लग्न केलं. अलीकडे सीमा आणि सचिनला एक मुलगाही झाला आहे.
सीमाच्या नवऱ्याने केला भारत सरकारकडे अर्ज
सीमा हैदर जेव्हा भारतात आली होती, तेव्हा भारतीय कायद्याचं पालन करत आहे. सीमाला उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारकडून खूप अपेक्षा आहे. सीमाचा पहिला नवरा गुलाम हैदर याने भारत सरकारकडे अर्ज केला होता. आता योग्य वेळ आहे, सीमाला भारतातून पाकिस्तानला परत पाठवून द्या. जर केंद्र सरकार तिला पाकिस्तानला पाठवत नसेल तर तिला तिथेच शिक्षा द्या, तिच्या चारही मुलांना तिच्याकडे पाठवून द्या, अशी विनंतीच हैदरने केली.
