एक मुलगी तिच्या आई-वडिलांमुळे कुत्र्याप्रमाणे वागते. ही घटना युक्रेनमधील एका मुलीसोबत घडली जी सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून खळबळ उडवत आहे.
Wedding Video : लग्नामध्ये पैशांऐवजी उडवलं सोनं, सूट-बूट घातलेले लोकही गोळा करण्यासाठी पळाले
ओक्साना मलाया नावाची मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा तिला कुत्र्यांमध्ये राहण्यास सोडण्यात आलं. तिचे आई-वडिल दारु पिऊन पडलेले असायचे त्यामुळे तिला सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी 3 वर्षांच्या ओक्सानाला घरातील कुत्र्यांमध्ये सोडलं. कुत्र्यांमध्ये राहताना तिच्या सवयी कुत्र्यांप्रमाणेच झाल्या. ती त्यांच्यासारखी भुंकते, चार पायांवर चालते, खायला खाते.
advertisement
ओक्साना 6 वर्षे कुत्र्यांसोबत राहिल्यानंतर समाजसेवी लोकांनी ओक्सानाला पाहिलं. तिनं माणसांशी जुळवून घेतलं पण तिच्या अनेक सवयी कुत्र्यांसारख्याच होत्या. आता ओक्साना 43 वर्षांची आहे आणि ती एका सामान्य व्यक्तीप्रमाणे जगते पण जेव्हाही तिला एकटेपणा जाणवतो तेव्हा ती कुत्र्यांसह वेळ घालवते असं ती सांगते.
