8 ऑगस्ट रोजीची ही घटना. फ्लाइट क्रमांक BA174.... न्यूयॉर्कहून लंडनला जाणारं हे विमान. हे विमान आकाशात असताना कॉकपिटचा दरवाजा उघडा होता.
सहसा लोक सुरक्षित आणि वेळ वाचवण्यासाठी प्रवास करतात परंतु बऱ्याचदा ज्या कर्मचाऱ्यांच्या हातात आपला प्रवास असतो त्यांना त्याची जबाबदारी समजत नाही. ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइट क्रमांक BA174 सोबतही असेच काही घडले. येथे पायलटने असे काही केले की त्याला मध्येच ड्युटीवरून काढून टाकावे लागले.
advertisement
Plane Facts : एक पायलट बाहेर, एअरहॉस्टेस आत, प्लेन ऑटो मोडमध्ये अन्...; विमानातील डर्टी सीक्रेट्स
अटलांटिक महासागराच्या अंतरावर उड्डाण करताना वैमानिकाने कॉकपिटचा दरवाजा उघडा ठेवला होता. प्रवाशी आणि क्रू मेंबर्सने हे पाहिलं. बराच वेळ दरवाजा उघडा राहिला आणि सगळे घाबरू लागले. क्रू मेंबर्सना उघडा दरवाजा दिसला तेव्हा त्यांनी संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पायलट कॉकपिट बंद न करता विमान का उडवत आहे? याचं कारण त्यांनी पायलटला विचारलं. कारण आणखी धक्कादायक होतं.
पायलटने सांगितलं की, त्याचं कुटुंब याच विमानातून प्रवास करत आहे. आपल्या कुटुंबाने आपल्याला विमान उडवताना पाहावं अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने कॉकपिटचा दरवाजा उघडा ठेवला. पायटलने कॉकपिटचा दरवाजा उघडा ठेवण्याचं जे कारण दिलं ते बिलकुल सामान्य नव्हतं. ब्रिटिश एअरवेजच्या सदस्यांनी अमेरिकेतील पायलटची तक्रार केली आणि अधिकाऱ्यांना पायलटला ड्युटीवरून हटवलं.
Taj Mahal Facts : ताजमहालवरून जात नाही विमान, पायलट तशी हिंमतही करत नाही? असं इथं काय आहे?
द सनच्या वृत्तानुसार, पायलटच्या निलंबनानंतर फ्लाइट रद्द करण्यात आली. फ्लाइट रद्द केल्याने शेकडो प्रवाशांवर परिणाम झाला, ज्यांच्यासाठी ब्रिटिश एअरवेजने पर्यायी उड्डाणांची व्यवस्था केली होती. नंतर सखोल चौकशी करण्यात आली आणि विमानात कोणतीही असुरक्षितता आढळली नाही. यानंतर पायलटच्या सेवा देखील पूर्ववत करण्यात आल्या.
कॉकपिटबाबत पायलटसाठी नियम
पायलट विमान उडवतात तेव्हा त्यांना कॉकपिटचे काही महत्त्वाचे प्रोटोकॉल पाळावे लागतात. उड्डाणाच्या सुरक्षिततेचा विचार करून, काही नियम निश्चित केले आहेत, जे पायलटला पाळावे लागतात. त्यात पायलट कॉकपिटमध्ये काय करू शकतो आणि काय करू नये हे सांगितलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कॉकपिटमध्ये अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. जाणून घेऊया कॉकपिटच्या नियमांबद्दल.
Plane Facts : प्रायव्हेट प्लेनमध्ये एअर हॉस्टेसना काय काय करायला लावतात अरबपती? शॉकिंग सीक्रेट्स
1) विमान कंपन्या '8 R' नियमाचे पालन करतात. यामध्ये, वैमानिक उड्डाणाच्या 8 तास आधी मद्यपान करू शकत नाही, म्हणजेच उड्डाणापूर्वी मद्यपान करण्यास मनाई आहे.
2) अनेक विमान कंपन्यांमध्ये, वैमानिकांना कॉकपिटमध्ये पुस्तके वाचण्यास मनाई असते, तर काही विमान कंपन्या फक्त वर्तमानपत्रे वाचण्याची परवानगी देतात. वर्तमानपत्रांना प्राधान्य दिले जाते कारण त्यात अनेक प्रकारचे लेख असतात आणि अशा परिस्थितीत पायलट त्यात पूर्णपणे गुंतलेला नसतो. परंतु पुस्तकात अडकण्याची शक्यता जास्त असते.
3) वैमानिकांना जास्त वेळ काम करावे लागत नाही. उड्डाणादरम्यान वैमानिक विश्रांती घेऊ शकतात, परंतु त्या काळात दुसरा वैमानिक सीटवर असावा. वैमानिकांना जास्त ताण दिला जात नाही.
4) विमानाचा कॅप्टन आणि पहिला अधिकारी एकसारखे अन्न खाऊ शकत नाहीत. यामागील कारण असे आहे की जर अन्नाची काही समस्या असेल तर एकच पायलट सुरक्षित राहील आणि सर्व काम हाताळेल.
5) विमान उडवताना, वैमानिक कॉकपिटमध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरू शकत नाहीत. इतकेच नाही तर दोन्ही वैमानिक एकत्र झोपू शकत नाहीत. सीटवर एकच वैमानिक असणे आवश्यक आहे.