खरंतर लोक प्रँक किंवा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अशा काही गोष्टी करतात की त्यामुळे त्यांचं स्वत:चं नुकसान होतं त्यानंतर कधीकधी पश्चातापाची देखील वेळ येते. असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं.
या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला त्या व्यक्तीच्या कृत्यावर नक्कीच हसू येईल शिवाय त्याची दया देखील येईल.
advertisement
खरंतर या तरुणाने एक सुपर ग्लू घेतला आणि तो आपल्या ओठांना लावला आणि आपले ओठ चिकटवले. हा सगळा प्रकार त्यांनी फोनमध्ये कैद केला. पण नंतर मात्र त्याची अवस्था खूपच वाईट झाली.
खरंतर या तरुणीचे ओठ असं काही एकमेकांना चिकटले की जणू ते लहापणापासूनच असे होते. यानंतर या तरुणाला कळून चुकलं की आपण खूप मोठी चुक केली आहे. अखेर त्याच्यावर रडण्याची पाळी आली. पण त्याचा काही फायदा झाला नाही कारण त्याचे ओठ काही उघडलेच नाही. हा व्हिडीओ इकडेच संपला आहे.
या तरुणासोबत पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही. पण कदाचित त्याच्याकडे आता डॉक्टरकडे जाण्याशिवाय काहीही पर्याय उरला नसावा असंच वाटतंय.
लोक प्रसिद्धीसाठी अशा विचित्र गोष्टी करतच असतात या तरुणाने देखील असंच केलं. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडल आहे. त्यामुळे त्याने हा व्हिडीओ शेअर करताच तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
