अल्मोडा : अनेक जणांना पेंटिंगची आवड असते. अनेक जण विविधप्रकारे पेंटिंग काढत असतात. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का, नखानेसुद्धा पेंटिंग काढता येते? तर हो हे खरंय. एक व्यक्ती अशी आहे, जे नखाने पेटिंग काढतात. त्यांचे पेंटिंग पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, इतके छान पेंटिंग नखाने काढतात.
शेखर चंद्र जोशी असे या व्यक्तीचे नाव आहे. उत्तराखंड राज्यातील अल्मोडा येथील रहिवासी असलेले प्राध्यापक शेखर चंद्र जोशी हे आपल्या नखाने कागदावर अत्यंत सुंदर अशी पेंटिंग काढतात. शेखर चंद्र जोशी हे अल्मोडा येथील सोबन सिंह जीना विद्यापीठात कला विषयाचे प्राध्यापक आहेत. शेखर चंद्र जोशी यांनी आपल्या नखांनी अशी छायाचित्रे काढली आहेत, जी पाहून तुम्हालाही क्षणभर आश्चर्य वाटेल.
advertisement
22 जानेवारीला अयोध्येत विराजना झालेल्या रामललाचे चित्र त्यांनी आपल्या नखांनी काढली. याशिवाय त्यांनी आत्तापर्यंत काढलेली अनेक चित्रे देश-विदेशात पाठवली आहेत. प्रोफेसर शेखर चंद्र जोशी 1999 पासून नखांनी चित्रे काढत आहेत. ते म्हणाले की, जेव्हा ते हायस्कूलमध्ये शिकत होते तेव्हा त्यांचे शिक्षक इम्तियाज अली खान नखांनी रंगवायचे. त्यांना पाहून प्राध्यापक जोशी यांनी ही कला शिकली. तेव्हापासून ते सतत त्यावर काम करत आहेत.
कमळचे फूल असो किंवा मग कोणत्याही व्यक्तीचा फोटो, ते कोणतेही चित्र आपल्या नखांनी कागदावर उतरवतात. त्यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपणीचे पोर्ट्रेट, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंग आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचीही नखांनी चित्रे काढली आहेत. त्यांनी नखांनी बनवलेले रामललाचे चित्र बनवायला सुमारे दोन तास लागल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना ते खूप आवडले आहे. ते अयोध्या ट्रस्टकडे पाठवणार आहेत. त्यासाठी त्यांनी पत्र पाठवले आहे.
पत्नीने केलं पतीचं स्वप्न पूर्ण, आता होणार डेप्युटी जेलर; वाचा, प्रेरणादायी कहाणी
पर्वतीय जीवन आणि लोकांच्या चेहऱ्याच्या चित्रांव्यतिरिक्त, ते इतर प्रकारचे पेंटिंगही काढतात. त्यासाठी ते सतत सराव करतात. त्यांची अनेक चित्रे कोरिया, फ्रान्स, कॅनडा, इटली आणि दक्षिण आफ्रिका येथेही पाठवण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.