‘पलंग तोड’ मिठाई म्हणजे काय?
ही मिठाई वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते - बेड बँड, बेड रोल आणि सगळ्यात प्रसिद्ध नाव म्हणजे पलंग तोड. तिचा आकार आणि रचना पाहता ही नावं ठेवली गेली आहेत. ही मिठाई गोलसर व बेडसारख्या रचनेत बनवली जाते, म्हणून 'बेड बँड' किंवा 'बेड रोल' असं नाव पडलं. पण 'पलंग तोड' हे नाव तिच्या मजेशीर आणि लक्ष वेधून घेणाऱ्या डिझाइनमुळे अधिक गाजलं.
advertisement
ही मिठाई कशी तयार केली जाते?
‘पलंग तोड’ ही मिठाई परंपरागत आणि पौष्टिक घटकांपासून तयार केली जाते- दूध आणि शुद्ध देशी तूप यांचा वापर होतो. ही मिठाई जितकी दिसायला आकर्षक आहे, तितकीच ती चवीलाही उत्तम असते. तिची बनावट आणि अनेक थर इतकी देखणी असते की पाहतानाच तोंडाला पाणी सुटतं. ही मिठाई एकदम मऊसर आणि साखरेचा बरोबर तडका असलेली असते.
या मिठाईचे कारागीर कुलदीप खंडेलवाल सांगतात की, जरी या मिठाईचं नाव मजेशीर असलं तरी ती तयार करणं ही एक गंभीर आणि पारंपरिक कला आहे. ती बनवण्यासाठी मेहनत आणि अनुभव खूप महत्त्वाचे असतात. कुलदीप म्हणतात की, “या मिठाईचं फक्त चव नाही, तर नावसुद्धा लोकांच्या लक्षात राहतं. एकदा खाल्लं की विसरणं शक्यच नाही, आणि एकदा ऐकलं की गमतीशीर वाटतं.”
सोशल मीडियावरही ‘पलंग तोड’चा धुमाकूळ!
भरतपूरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही मिठाई आकर्षणाचं केंद्र बनली आहे. सोशल मीडियावरही ‘पलंग तोड’चा बोलबाला आहे. अनेक लोक म्हणतात, "भरतपूरला गेल्यावर 'पलंग तोड' खाल्ली नाही, तर तुमची ट्रिपच अपूर्ण राहते!" ही खास मिठाई फक्त नावामुळे नाही, तर तिच्या चवेमुळेही लोकांच्या मनात घर करते. आणि म्हणूनच, भरतपूरच्या गोड आठवणींमध्ये ‘पलंग तोड’चा नंबर अगदी वरचा आहे!
हे ही वाचा : Well: महाराष्ट्रातील या गावात आहे 800 वर्षे जुनी विहीर, पाहिल्यावर होईल राजवाड्याचा भास, Video
हे ही वाचा : 'सौंदर्या'ची जादू! कुंभमेळ्यात रुद्राक्षाची माळ विकणाऱ्या 'मोनालिसा'चं येतंय गाणं; टीझर व्हायरल
