TRENDING:

पावसाचं पाणी घरात आणण्यासाठी महिलेचा जुगाड, Viral Video पाहून नक्कीच कराल कौतुक

Last Updated:

काही सोसायटी देखील अशा प्रकारांचा वापर करतात. पण असं असलं तरी देखील वैयक्तिक पातळीवर आपण जर हे केले तर त्यात आपला फायदा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 02 ऑगस्ट : सोशल मीडियावर तुम्ही अनेक जुगाडाचे व्हिडीओ पाहिले असतील. ज्यामध्ये लोक आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंचा असा काही वापर करतात की ज्याचा फायदा त्यांना होतोच शिवाय पैसे ही वाचतात. अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका महिलेनं जुगाड केला आहे. पण हा जुगाड तिच्या पुरता न ठेवता आपण सर्वांनी अवलंबला तर त्यामुळे सगळ्यांचाच फायदा होईल.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल तुम्ही ऐकले असेलच पावसाचे पाणी साठवण्याचे अनेक मार्ग आहेत. काही सोसायटी देखील अशा प्रकारांचा वापर करतात. पण असं असलं तरी देखील वैयक्तिक पातळीवर आपण जर हे केले तर त्यात आपला फायदा आहे.

या व्हिडीओमध्ये महिलेनं पावसाच्या पाण्याला घरच्या घरी एका जुगाडाने जमा केले आहे. ज्याचा वापर ती घरातील इतर काम करण्यासाठी वापरते. या युक्तीने ती तिच्या पद्धतीने पावसाच्या पाण्याला वाचवण्याचं काम करत आहे.

advertisement

भारतात आजही असे काही भाग आहेत जिथे लोकांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं. ज्यामुळे तेथील लोकांना मैलो चालत जाऊन पाणी भरुन आणावं लागतं. अशावेळी आपण उचलेलं हे लहान पाऊल खरंच महत्वाचं आणि फायद्याचं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मोडलेली छत्री किंवा काळ्या प्लास्टिकसारखी गोष्ट खिडकीला बांधली आहे. ज्यामध्ये पावसाचे पाणी पडत आहे. या काळ्या भागाला प्लास्टिकची एक बाटली जोडली आहे आणि त्या बाटलीला पाण्याचा पाईप जोडला आहे. जो थेट बाथरुमपर्यंत जात आहे. जिथे हे पाणी एका टबमध्ये जमा होत आहे.

advertisement

त्यानंतर व्हिडीओमधील महिला मोठ्या निळ्या ड्रममध्ये संपूर्ण पाणी टाकत आहे. नंतर ती त्या पाण्याने कपडे धुताना दिसत आहे. पावसाचे पाणी वाचवण्याचा हा जुगाड अगदी सोपा आणि साधा आहे. जो आपल्यापैकी कोणीही घरी ट्राय करु शकतं.

तुम्हाला ही वॉटर हार्वेस्टिंगची युक्ती कशी वाटली? नक्की कळवा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीच्या दरात झाली मोठी वाढ, सोयाबीनला काय मिळाला दर?
सर्व पहा

हा व्हिडिओ 19 जुलै रोजी pranaligaikwad_1998_ या हँडलने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. कॅप्शन कसा वाटला जुगाड? या व्हिडीओला लोकांकडून खूप जास्त पसंत मिळत आहे. लोक या व्हिडीओला एकमेकांना शेअर देखील करत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स देखील केल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
पावसाचं पाणी घरात आणण्यासाठी महिलेचा जुगाड, Viral Video पाहून नक्कीच कराल कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल