रीजेंट इंटरनॅशनल अपार्टमेंट बिल्डिंग
या इमारतीत एकूण 39 मजले आहेत आणि ती इंग्रजीतील ‘S’ आकारात बांधलेली आहे. ही बिल्डिंग सुरुवातीला एक लक्झरी हॉटेल म्हणून बांधली गेली होती, पण नंतर तिचं रूपांतर अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये करण्यात आलं, ज्यात आता सुमारे 20000 लोक राहू शकतात.
‘रीजेंट इंटरनॅशनल’ ही केवळ एक निवासी इमारत नाही, तर ती एक मिनी सिटीच आहे. रहिवाशांना इमारतीमध्येच सर्व आवश्यक सुविधा मिळतात. यात एक शाळा, एक मोठा फूड कोर्ट, एक स्विमिंग पूल, एक किराणा दुकान, केशकर्तनालय, सौंदर्य केंद्र आणि कॅफे आहेत. याचा अर्थ असा की, एखादी व्यक्ती इमारतीबाहेर न जाताही आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकते.
advertisement
तंत्रज्ञान आणि डिझाइनचा अनोखा संगम
या इमारतीच्या बांधकामात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तींना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. यामुळेच ही इमारत केवळ एक निवासी जागा नाही, तर एक लोकप्रिय पर्यटन स्थळही बनली आहे. जगभरातील पर्यटक ती पाहण्यासाठी आणि तिच्या अपवादात्मक सुविधांचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात.
हे ही वाचा : Hotel Facts : हॉटेल रूममध्ये जाताच बाथरूममध्ये ठेवा बॅग, तज्ज्ञांचा अजब सल्ला, पण फायदा मोठा
हे ही वाचा : General Knowledge : कधीच मरत नाहीत हे जीव! काही मृत्यूला चकवा देतात, काहींना 'अमरत्वाचं वरदान'
