‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रकाशित झालेल्या 'पासिंग स्टार्स अॅज अॅन इम्पॉर्टंट ड्रायव्हर ऑफ पॅलिओक्लायमेट अँड सोलार सिस्टीम ऑर्बिटर इव्होल्यूशन' नावाच्या स्टडीनुसार, लाखो वर्षांपूर्वी अशा प्रकारचे बदल ग्रहांच्या कक्षेत झाले आहेत. जेव्हाजेव्हा असं घडलं तेव्हा पृथ्वीचं तापमान आठ अंश सेल्सिअसने वाढलं होतं.
(हेही वाचा - विक्रीसाठी आहे हा ऐतिहासिक किल्ला; एखाद्या बंगल्यापेक्षाही कमी किमतीत मिळतोय)
advertisement
या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, जेव्हा एखादा मोठा तारा ग्रहाच्या जवळून जातो तेव्हा त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ग्रहामध्ये थोडासा बदल होतो. परिणामी, त्या ग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची कक्षासुद्धा बदलते. पृथ्वीच्या भूगर्भीय नोंदीवरून असं लक्षात येतं की, तिच्या कक्षेतील बदलांमुळे हवामानात बदल झाले आहेत.
शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आयुष्यातील 4.5 अब्ज वर्षांच्या काळात घडलेल्या घटना समजून घेण्यासाठी आणि ग्रहाच्या कक्षेत भूतकाळात झालेल्या बदलांचा अंदाज घेण्यासाठी सिम्युलेशनद्वारे विस्तृत संशोधन केलं. त्यांनी 28 लाख वर्षांपूर्वी घडलेली एक घटना निवडली. या घटनेत सूर्यासारखा एचडी 7977 नावाचा तारा सूर्यमालेजवळून गेला होता.
हा तारा ऊर्ट ढगांमधून (ट्रान्स-नेपच्युनियन प्रदेशातील ढग) गेला होता. तो सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या अंतरापेक्षा जास्त अंतरावरून गेला होता. तो पृथ्वीपासून 31 हजार पट जास्त अंतरावर होता. तरीसुद्धा त्याचा खूप खोल परिणाम होऊ शकला असता. हे अंतर 31 ते 4 हजार पट असलं असतं. पृथ्वीच्या कक्षेत जेव्हा-जेव्हा बदल झाला आहे, तेव्हा पृथ्वीवर डूम्सडेसारख्या विनाशकारी घटना घडल्या आहेत, हे अगोदरच मान्य करण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, भूतकाळातील नाही पण, भविष्यातील बदलांची अचूक गणना करून अशा घटनांचा अंदाज लावता येऊ शकतो.
