महिलेला सर्दी खोकला झाला होता मात्र खरंतर तो एक गंभीर आजार होता. आणि या आजारामुळे तिला तिचे हात-पाय गमवावे लागले. हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्हालाही नॉर्मल काही त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरकडे जा अन्यथा तुमच्यासोबतही असा प्रकार घडेल.
स्कुटीवर जात होता तरुण, अचानक कुत्र्याने पकडला पाय आणि....थरारक घटनेचा VIDEO
advertisement
शेरी मुडी नावाच्या 51 वर्षाच्या महिलेसोबत हा प्रकार घडला. शेरी एक शिक्षक आहे. ती शाळेतील विद्यार्थ्यांसोबत सहलीला गेली होती. मात्र अचानक तिचे हात पाय थंड पडायला लागले. मात्र तिला वाटलं हा नॉर्मल सर्दी खोकला असेल. मात्र पाच दिवसांत महिलेची पूर्ण तब्बेत कोसळली आणि तिला हॉस्पिटल गाठावं लागलं.
डॉक्टरांनी शेरीचं चेकअप केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही इन्फेक्शन आहे. शेरीला स्ट्रेप्टोकॉकस नावाचं इन्फेक्शन झालं होतं. काहीच वेळात महिलेच्या पूर्ण शरीरात हे इन्फेक्शन पसरलं. ज्यामुळे तिचे हात पाय कापावे लागले. एका इन्फेक्शनने महिलेला आयुष्यभरासाठी व्हिलचेअरवर बसवलं.
