स्कुटीवर जात होता तरुण, अचानक कुत्र्याने पकडला पाय आणि....थरारक घटनेचा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
कुत्र्याला खूप प्रामाणिक म्हटलं जातं. मात्र ते जेवढे प्रेमळ असतात तेवढेच भयानकही असतात. कधी हल्ला करतील आणि लचका तोडतील सांगता येत नाही. विशेषतः रस्त्याने जाताना कुत्रे जास्त हल्ले करतात.
नवी दिल्ली : कुत्र्याला खूप प्रामाणिक म्हटलं जातं. मात्र ते जेवढे प्रेमळ असतात तेवढेच भयानकही असतात. कधी हल्ला करतील आणि लचका तोडतील सांगता येत नाही. विशेषतः रस्त्याने जाताना कुत्रे जास्त हल्ले करतात. रस्त्यावर चालताना किंवा गाडीवर असेल तरीही ते चावा घेतात. अशातच कुत्र्यांच्या हल्ल्याची आणखी एक घटना समोर आलीय. ज्यामध्ये तो गाडीवर जाणाऱ्या तरुणाच्या पायाला चावा घेतो. बराच वेळ त्याचा पाय सोडत नाही, एवढ्या हल्ल्याच्या घटनेतही तरुण व्हिडीओ बनवतो.
कुत्र्यांच्या हल्ल्यांसंबधित दररोज घटना समोर येत असतात. अशातच कुत्र्याच्या हल्ल्याच्या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय. या व्हिडीओ खूपच भयंकर आहे. तरुणानं स्वतःवर हल्ला होतानाचा व्हिडीओ शूट केलाय. जो सध्या सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवतोय.
समोर आलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण स्कूटी चालवतोय आणि कुत्र्या येऊन त्याच्या पायाचा चावा घेतो. कुत्र्याने स्कूटी चालकाचा पाय दाताने पकडला. कुत्रा त्याचा पाय चावण्याचा प्रयत्न करत होता तरी स्कूटर चालक गाडी चालवत राहिला. एवढंच नाही तर तो मोठ्याने ओरडत होता आणि व्हिडीओही बनवत होता. अशा संकटात कोणाला व्हिडीओ काढायचं सुचेल का? मात्र हा तरुण हल्ला होत असतानाही व्हिडीओ काढण्याच्या मागे लागला.
advertisement
advertisement
ammcharkueytiaw नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. दरम्यान रस्त्याने कुत्र्यांचा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा अनेक हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तेही एकापेक्षा एक भयानक हल्ले. त्यामुळे रस्त्याने जाताना भटक्या कुत्र्यांपासून सतर्क राहा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2024 7:09 PM IST










