एनडीए आघाडीकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा आहेत. मात्र यावेळी सरकार जेडीयू नेते नितीश कुमार आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून आहे. हे दोन्ही नेते एनडीए किंवा इंडिया आघाडीत सामील होऊ शकतात. त्यानंतर पुढील सरकार स्थापन होईल. सरकारमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत आल्यानंतर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याबद्दल सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे.
advertisement
ही तर जगातील सर्वात महागडी निवडणूक, बजेट ऐकून बसेल धक्का
4 आणि 5 जून या दिवशी मीम्स चा अक्षरशः पूर आला. सामन्यपणे आमच्या प्लॅटफॉर्मवरून दिवसाला सरासरी 1 लाख memes शेअर होतात. 4 आणि 5 जूनला हा आकडा 2.7 लाखांच्या पार गेला, असं MemesChat चे संस्थापक तारण चन्ना यांनी सांगितलं.
भाजपप्रणीत एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. परिणामी सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एनडीएच्या इतर मित्रपक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत शपथग्रहण सोहळ्याची तारीख ठरवण्यात आली आल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NDA नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. 8 जून रोजी नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या खासदारांनी नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. तर एनडीएच्या सर्व खासदारांच्या बैठकीत मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यात आला आहे.