एक महिला तिचं बाळ आणि डिलिव्हरी बॉय लिफ्टने चालले असतात. अचानक लिफ्टचा काहीतरी तांत्रिक बिघाड होतो आणि लिफ्ट कोसळायला लागते. डिलिव्हरी बॉयच्या सतर्कतेमुळे सर्वाचे प्राण वाचतात. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Video: शिंगांनी उचलून फेकलं, पायांनी तुडवलं; गायीचा मुलीवर जीवघेणा हल्ला
व्हिडिओच्या सुरुवातीला लिफ्टमध्ये एक डिलिव्हरी बॉय आणि महिला तिच्या लहानग्या बाळासोबत दिसत आहे. अचानक असं काही घडतं की लिफ्ट बंद पडते. त्यामुळे आई आणि मूल खूप घाबरतात, पण डिलिव्हरी बॉय धाडस दाखवतो आणि दार उघडेपर्यंत आई आणि मुलाची काळजी घेतो. दरवाडा उघडताच तो आई आणि मुलाला पहिल्यांदा बाहेर पाठवतो आणि मग स्वतः बाहेर पडतो. डिलिव्हरी बॉयचे धाडस पाहून लोक त्याचं कौतुक करत आहेत.
advertisement
Good News Movement नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक अनेक कमेंट करत डिलिव्हरी बॉयचं कौतुक करत आहेत. व्हिडीओ कमी वेळात खूप व्हायरल झाला असून व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंटही आले आहेत.
