झांसीचा सिव्हिल इंजिनियर असलेला नवरदेव अभिजीतने आपली नवरी बबलीला बैलगाडीतून घरी घेऊन गेला. वरातीमध्ये लोक ढोल-ताशांच्या तालावर नाचताना आणि झुलताना दिसत होते. रस्त्याने जाणारे लोकही फुलं आणि पताकांनी सजलेल्या बैलगाडीत बसलेल्या नवरानवरीला पाहून चकित झाले होते. त्यांच्याकडे एकटक बघतच राहिले.
नाचणारी, झुलणारी बैलगाडी
फुलांनी सजलेल्या त्या बैलगाडीत वरातीमधील लोक ढोल-ताशांच्या तालावर मनसोक्त नाचत आणि झुलत होते. या अनोख्या वरातीबद्दल नवरदेव अभिजीत म्हणाला की, त्याची नाळ जमिनीशी जोडलेली आहे, म्हणून त्याने आपल्या नवरीला बैलगाडीतून निरोप दिला. ही त्यांच्या कुटुंबात नेहमीपासून चालत आलेली पारंपरिक पद्धत आहे. अभिजीतने सांगितलं की, त्याला आपली परंपरा आणि जमीन यांच्याशी जोडलेलं राहायचं आहे, म्हणून त्याने हा मार्ग निवडला. या दरम्यान, रस्त्याने जाणारे लोक नवरानवरीला फुलांनी सजलेल्या बैलगाडीत बसलेले पाहून आश्चर्यचकित झाले होते.
advertisement
नवरदेवाचे वडील काय म्हणाले...
अभिजीतचे वडील संतोष विश्वकर्मा म्हणाले की, जुन्या परंपरा आता लयाला चालल्या आहेत. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. साधनांचा आदर केला पाहिजे. आजकालच्या यंत्रांच्या युगात लोकांना शांती आणि आनंद मिळत नाहीये. बैलगाडीतून घरी घेऊन येण्यामागे संदेश हाच आहे की लोकांनी जुन्या काळात परत जावं, ज्यामुळे देशाला समृद्धी मिळेल.
हे ही वाचा : पारंपरिक शेतीला दिला छेद, या शेतकऱ्याने केली 'ही' शेती; कमी खर्चात झाली 12 लाखांची कमाई!