पारंपरिक शेतीला दिला छेद, या शेतकऱ्याने केली 'ही' शेती; कमी खर्चात झाली 12 लाखांची कमाई!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
शेतकरी जयदीप ब्रार यांनी पारंपरिक शेतीला नाकारून L-49 या पेरूच्या विशेष जातीची फळबाग लावली. कमी खर्च, रोगप्रतिबंधक क्षमता, मोठं उत्पादन आणि...
जर पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी नवीन केलं, तर नक्कीच यश मिळतं. रामपूरमधील बिलासपूर तालुक्यातील शेतकरी जयदीप ब्रार यांनी असंच काहीतरी करून दाखवलं आहे. त्यांनी पारंपरिक शेतीसोबत 'L-49' नावाच्या खास जातीच्या पेरूंची बाग फुलवली. आज ते दरवर्षी 10 ते 12 लाख रुपये कमवत आहेत. त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जयदीप ब्रार सांगतात की, इतर फळांच्या तुलनेत 'L-49' ची काळजी घेणं खूप सोपं आहे. या जातीला कमी पाण्यातही चांगलं उत्पादन मिळतं आणि ती जास्त काळ टिकते. ते म्हणाले की, सुरुवातीला त्यांनी या जातीच्या पेरूची लागवड फक्त एक प्रयोग म्हणून केली होती, पण जेव्हा बाजारात चांगला नफा मिळाला, तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणावर याची लागवड केली.
advertisement