वराच्या गावात पत्रकं वाटली
आग्रा जिल्ह्यातील एका वराला वरात निघण्याच्या दोन दिवस आधी धमकी मिळाली आहे. वर हा बाह येथील बसावणी गावाचा रहिवासी आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी वराच्या गावात पत्रकं टाकली. या पत्रकांमधून धमक्या देण्यात आल्या. भिंडला वरात आणू नका, असं लिहिलेलं होतं. वरात आली, तर वराला गोळ्या घालण्यास भाग पाडलं जाईल, असं म्हटलं होतं.
advertisement
हे आहे प्रकरण
बसावणी भागातील एका तरुणाचं लग्न भिंडमधील एका मुलीशी ठरलं आहे, असं सांगण्यात आलं आहे. 25 फेब्रुवारीला लग्नाचा विधी आणि जेवणाचा कार्यक्रम झाला. 5 मार्चला वरात भिंडला जाणार होती. याआधी, सोमवारी, दुचाकीवरून दोन मुखवटा घातलेले तरुण वराच्या गावात पोहोचले. इथे या दुचाकीस्वारांनी विविध ठिकाणी पत्रकं टाकली, ज्यावर वधूचं नाव लिहिलेलं होतं. त्यासोबतच भिंडला वरात आणू नका, अन्यथा गोळ्या घालू, अशी धमकी लिहिलेली होती.
धमकी मिळाल्यानंतर...
वराकडील लोकांनी वधूच्या कुटुंबाशी बोलणं केलं. ही माहिती मिळाल्यानंतर वधूच्या कुटुंबातील लोकंही घाबरले आहेत. मात्र, त्यांनी वरात घेऊन या, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. दुसरीकडे, वधूच्या लोकांशी बोलल्यानंतर वराकडील लोकांचाही धीर वाढला आहे. ते म्हणतात की, आता ही प्रतिष्ठेची बाब आहे, आम्ही वरात नक्कीच घेऊन जाऊ. कुटुंबाने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास करून एका तरुणाला कलम 151 अन्वये अटक करून तुरुंगात पाठवलं. पोलिसांच्या संरक्षणाखाली लग्नाचे सर्व विधी पार पडत आहेत.
हे ही वाचा : Weird Place : असं ठिकाण जिथं मूल जन्मालाच येत नाही, रहस्य काय?
हे ही वाचा : शहरी जीवनाला वैतागलं कपल, फ्लॅट विकला अन् खरेदी केलं अख्खं गाव, जनावरं पाळून आहेत समाधानी!