Weird Place : असं ठिकाण जिथं मूल जन्मालाच येत नाही, रहस्य काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
कित्येक देशांची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. पण एक असा देश जिथं एकही मूल जन्माला येत नाही. गेल्या 96 वर्षांपासून इथं मूल जन्माला आलेलंच नाही. यामागे नेमकं कारण काय आहे?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महत्त्वाची माहिती अशी आहे की या देशाच्या निर्मितीपासून इथं कोणतंही रुग्णालय बांधलेलं नाही. रुग्णालय बांधण्यासाठी अनेक विनंत्या करण्यात आल्या, पण प्रत्येक वेळी त्या नाकारण्यात आल्या. अशा परिस्थितीत, जर इथं कोणी गंभीर आजारी असेल किंवा एखादी महिला गर्भवती असेल तर त्यांना रोममधील रुग्णालयात पाठवलं जातं.
advertisement
या देशात रुग्णालय न उघडण्याचा निर्णय त्याच्या लहान आकारामुळे आणि आजूबाजूच्या परिसरातील वैद्यकीय सुविधांच्या दर्जामुळे घेण्यात आला असावा असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात याचं क्षेत्रफळ फक्त 118 एकर आहे. अशा परिस्थितीत, सर्व रुग्णांना उपचारांसाठी रोममधील क्लिनिक आणि रुग्णालयात दाखल करावं लागतं. इथं प्रसूती कक्ष नसल्याने कोणीही मुलाला जन्म देऊ शकत नाही.
advertisement