न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 47 वर्षीय लिझ मर्फी आणि त्यांचे 56 वर्षीय पती डेव्हिड यांनी त्यांचा फ्लॅट विकला आणि त्या पैशातून अख्खं गाव खरेदी केलं. आता ते इथे शेळ्या आणि कोंबड्या पाळत आहेत आणि शहराकडे पुन्हा वळून पाहू इच्छित नाहीत. ते म्हणतात की, त्यांची कमाई कमी झाली असली, तरी ते इथे इतके निवांत आहेत की, त्यांना परत जायचं नाही.
advertisement
जोडप्याने खरेदी केलं ऐतिहासिक गाव
या जोडप्याने जानेवारी 2021 मध्ये दक्षिण-पश्चिम फ्रान्समधील लॅक डी मेसन हे ऐतिहासिक गाव खरेदी केलं. यासाठी त्यांनी यूकेमधील मँचेस्टरमधील त्यांचं तीन बेडरूमचं घर विकलं. यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी 400 वर्षं जुनी 6 घरं, दोन गोठे आणि तीन एकर जमीन खरेदी केली. जेव्हा ते इथे आले, तेव्हा त्यांनी या ठिकाणाला शांत व्यावसायिक स्थळ बनवलं. जोडप्याच्या या प्रकल्पांनंतर त्यांचे पालकही तिथे स्थायिक झाले, त्यामुळे त्यांना परत यायचं नाही.
शेळ्या, कोंबड्या आणि मांजरी पाळल्या
एकेकाळी रेडिओमध्ये काम करणाऱ्या या जोडप्याने त्यांच्या गावातील तीन घरांचं सुट्टीच्या घरांमध्ये रूपांतर केलं आहे. ते या घरांवर सोलर पॅनेलही बसवत आहेत, ज्यांची एकूण क्षमता 19 लोकांची आहे, जेणेकरून ते अधिक व्यवस्थापित होतील. जोडपं म्हणतं की, ते यूकेमध्ये पूर्वी जितके पैसे कमवत होते, तितके ते कमवू शकत नाहीत, पण त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारली आहे. त्यांचा ताण कमी झाला आहे. कुटुंबाने तीन शेळ्या, चार कोंबड्या आणि तीन मांजरीही पाळल्या आहेत आणि ते शांत जीवन जगत आहेत.
हे ही वाचा : नवर्याने गुपचूप घेतला बायकोचा मोबाईल, तिला समजलं, त्यानंतर जे घडलं ते तो आयुष्यात विसरणार नाही
हे ही वाचा : Weird Place : असं ठिकाण जिथं मूल जन्मालाच येत नाही, रहस्य काय?