TRENDING:

Train Ticket : ट्रेनचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही? तिकिटावरील 'या' कोडवरूनच समजेल

Last Updated:

बऱ्याचदा काय होतं की आधीच बुकिंग करूनही रेल्वेचं तिकीट कन्फर्म होत नाही. काही वेळा तर तिकीट कॅन्सल होतं. वेटिंग लिस्टमध्ये तिकीट असेल तर आपल्याला आशा असते की ते कन्फर्म होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारतात रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवास सर्वांत स्वस्त व आरामदायक आहे. आपण रेल्वेने प्रवास करण्यासाठी रिझर्व्हेशन करू शकतो. तत्काल रिझर्व्हेशन करता येतं, याशिवाय काही महिन्यांआधीही तुम्ही तिकीट बुक करू शकता; पण बऱ्याचदा काय होतं की आधीच बुकिंग करूनही रेल्वेचं तिकीट कन्फर्म होत नाही. काही वेळा तर तिकीट कॅन्सल होतं. वेटिंग लिस्टमध्ये तिकीट असेल तर आपल्याला आशा असते की ते कन्फर्म होईल; पण ऐन वेळी ते कॅन्सल होतं आणि मग आता काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो.
रेल्वेचं तिकीट कन्फर्म होणार की नाही?
रेल्वेचं तिकीट कन्फर्म होणार की नाही?
advertisement

तिकिट बुक केल्यावर वेटिंग असेल तर किती वेटिंग आहे याची लिस्ट वेळोवेळी अपडेट होत असते. तुम्ही तिकीट बुक केल्यावर तुमच्या तिकीट कोडवरून चार्ट प्रीपेअर होण्याआधी तुमचं तिकीट कन्फर्म होणार की नाही हे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या तिकिटावरचा कोड पाहावा लागेल. तिकिटावरच्या कोणत्या कोडचा अर्थ काय होतो आणि तो कोड असेल तर तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता किती असते ते जाणून घेऊ या.

advertisement

कोणता आहे तो तिकिटावरील कोड?

RLWL - याचा अर्थ रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट असा होतो. तिकिटावर हा कोड असेल तर असं तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता थोडी कमी असते.

PQWL - याचा अर्थ पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट असा होतो. तिकिटावर हा कोड असेल तर ते तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते.

advertisement

कॉमन कोड - वेटिंग लिस्टमधला सर्वांत कॉमन कोड GNWL असतो. याचा अर्थ जनरल वेटिंग लिस्ट असा होतो. असा कोड असलेली तिकिट्स कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते.

TQWL - याचा अर्थ तत्काल कोटा वेटिंग लिस्ट असा होतो. तत्काल कोटामध्ये तुम्ही रेल्वेचं तिकीट बुक केलं असेल; पण ते कन्फर्म न होता वेटिंगमध्ये असेल तर त्याला TQWL तिकीट म्हणतात. असं तिकीटही कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते. कारण रेल्वेकडे या तिकिटांसाठी वेगळा कोटा नसतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
सर्व पहा

RSWL - या कोडचा अर्थ रोड साइड स्टेशन वेटिंग लिस्ट असा होतो. ही तिकिट्सही कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते.

मराठी बातम्या/Viral/
Train Ticket : ट्रेनचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही? तिकिटावरील 'या' कोडवरूनच समजेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल