मोठ्या ओठांच्या आकर्षक अभिनेत्री आपण पाहिल्या असतील, पण मोठ्या ओठांचा मासा कधीच पाहिला आहे का? या माशाचे ओठ हाॅलिवूड सेलिब्रिटींनाही टक्कर देऊ शकतो. पण नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून हा विचित्र पाहून प्रश्न पडलाय की, या प्राणी आहे तरी कोण?
माणसांसारखे ओठ असलेला प्राणी
व्हायरल व्हिडिओमध्ये, एका प्राण्याचे मोठे, माणसांसारखे ओठ आणि दात दिसत आहेत. पहिल्या क्षणी पाहताच ते एखाद्या माणसाचे ओठ अगदी जवळून दाखवल्यासारखे वाटतात. मात्र, हे ओठ एका जलचर प्राण्याचे आहेत, ज्याचे दिसणारे दात माणसांसारखे असल्यामुळे ते अधिकच रहस्यमय वाटत आहे.
advertisement
@AMAZlNGNATURE अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा प्राणी एक प्रकारचा मासा आहे, असं सांगितलं आहे. अनेक नेटिझन्सनी याला ट्रिगर फिश म्हणून ओळखलं, ही प्रजाती समुद्राच्या तळाशी राहते. त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे त्याचे ओठ सपाट आणि माणसांसारखे दिसतात. त्याचे दातही खूप तीक्ष्ण असतात, इतके की ते धातूही कापू शकतात. रिपोर्ट्सनुसार, ट्रिगरफिशच्या किमान 30-40 प्रजाती आहेत, ज्यापैकी बहुतेक प्रजातींचे ओठ मोठे असतात, ज्यामुळे ते आणखी विचित्र दिसतात.
हे ही वाचा : General Knowledge : कधीच मरत नाहीत हे जीव! काही मृत्यूला चकवा देतात, काहींना 'अमरत्वाचं वरदान'
हे ही वाचा : बाबो! या इमारतीत राहतात 20000 पेक्षा जास्त लोक, VIDEO पाहून नेटकऱ्यांची उडाली झोप
