बाबो! या इमारतीत राहतात 20000 पेक्षा जास्त लोक, VIDEO पाहून नेटकऱ्यांची उडाली झोप

Last Updated:

चीनच्या हाँगझोऊ शहरातील 'रिजेंट इंटरनॅशनल' ही जगातील सर्वात मोठी निवासी इमारत आहे. 39 मजल्यांच्या या इमारतीत 20000 लोक राहतात. येथे शाळा, बाजार, रेस्टॉरंट आणि स्विमिंग पूल यासारख्या सुविधा आहेत. तिची अनोखी रचना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ती जगभरातून पर्यटकांना आकर्षित करते.

News18
News18
जगातील सर्वात उंच इमारत म्हटलं की, दुबईच्या बुर्ज खलिफा आठवतो. पण जगातील सर्वात मोठी निवासी इमारत कोणती, हे तुम्हाला माहितीय? तर ती आहे चीनमधील हांग्झू येथे असलेली रीजेंट इंटरनॅशनल अपार्टमेंट बिल्डिंग. या इमारतीची रचना इतकी मोठी आहे की, त्यात संपूर्ण शहर राहू शकतं. कारण त्या इमारतीत तब्बल 20000 पेक्षा अधिक लोक राहतात.
रीजेंट इंटरनॅशनल अपार्टमेंट बिल्डिंग
या इमारतीत एकूण 39 मजले आहेत आणि ती इंग्रजीतील ‘S’ आकारात बांधलेली आहे. ही बिल्डिंग सुरुवातीला एक लक्झरी हॉटेल म्हणून बांधली गेली होती, पण नंतर तिचं रूपांतर अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये करण्यात आलं, ज्यात आता सुमारे 20000 लोक राहू शकतात.
‘रीजेंट इंटरनॅशनल’ ही केवळ एक निवासी इमारत नाही, तर ती एक मिनी सिटीच आहे. रहिवाशांना इमारतीमध्येच सर्व आवश्यक सुविधा मिळतात. यात एक शाळा, एक मोठा फूड कोर्ट, एक स्विमिंग पूल, एक किराणा दुकान, केशकर्तनालय, सौंदर्य केंद्र आणि कॅफे आहेत. याचा अर्थ असा की, एखादी व्यक्ती इमारतीबाहेर न जाताही आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकते.
advertisement
advertisement
तंत्रज्ञान आणि डिझाइनचा अनोखा संगम
या इमारतीच्या बांधकामात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तींना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. यामुळेच ही इमारत केवळ एक निवासी जागा नाही, तर एक लोकप्रिय पर्यटन स्थळही बनली आहे. जगभरातील पर्यटक ती पाहण्यासाठी आणि तिच्या अपवादात्मक सुविधांचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
बाबो! या इमारतीत राहतात 20000 पेक्षा जास्त लोक, VIDEO पाहून नेटकऱ्यांची उडाली झोप
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement