TRENDING:

गणरायाच्या भेटीसाठी आला वेगळाच भाविक, पाहून सर्वच जण चक्रावले, VIDEO

Last Updated:

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर अनेक जण चकीत झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट कशी व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सध्या सर्वात्र गणेशोत्सवाचे वातावरण असताना गणरायाची भक्ती आणि त्याची रुपे ही आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या पद्धतींमध्ये दिसते. तसेच गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले आपण आतापर्यंत अनेक भाविक पाहिले असाल. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो भाविकाचा नसून चक्क एका सापाचा आहे.

advertisement

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एक साप गणरायाच्या मंडपात आगमन करतो. गणरायाचे वेगवेगळे भाविक आपण पाहिले आहेत, पण या भाविकाने सर्वांच्याच भुवया उंचावतात. मंडपात आगमन करताच तो साप थेट गणरायाच्या गळ्यापाशी जातो. गळ्यापाशी गेल्यानंतर तो सोंडेवर ऐटीत उभा राहतो.

गणपतीची प्राणप्रतिष्ठा ते विसर्जनाची अत्यंत अनोखी पद्धत, तुम्ही पाहिली नसेल, मुंबईतील महिलेची कल्पना, VIDEO

advertisement

हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. कारण व्हिडिओतील साप मंडपात कोणीही नसताना गुपचूपपणे कोणालाही त्रास न देता शांतपणे येत आहे आणि बाप्पाला भेटत आहे. हा साप फक्त गणरायाच्या दर्शनासाठी आला की काय, असा प्रश्न सर्व जण उपस्थितीत करत आहेत.

बाप्पाला द्या गोड गोड नैवेद्य, बनवा चविष्ट आणि लुसलुशीत गोड वडे, सोपी रेसिपी, VIDEO

advertisement

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर अनेक जण चकीत झाले आहेत. बाप्पाच्या भेटीसाठी आलेला भाविक हा नक्कीच वेगळा आहे आणि त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असं म्हणायला हरकत नाही.

मराठी बातम्या/Viral/
गणरायाच्या भेटीसाठी आला वेगळाच भाविक, पाहून सर्वच जण चक्रावले, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल