तुरटीमध्ये तुरट गुणधर्म असतात. जे चेहऱ्यावरील खुली छिद्रं कमी करण्यास मदत करतात. तुरटीमुळे त्वचेवरील पिंपल्स देखील कमी होतात. त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे सुरकुत्या, बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. तुरटीमुळे त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. त्वचा घट्ट होण्यासाठी तुरटी हा एक उत्तम उपाय आहे. त्वचा टोन आणि मजबूत करण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे, असं मुंबईतील डॉ. शरीफा चौसे यांनी सांगितलं.
advertisement
चेहऱ्यावर तुरटी कशी वापरायची?
तुरटीचा छोटा खडा घ्या. तो पाण्यात विरघळवून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर मसाज करा. 15 मिनिटांनंतर, आपला चेहरा साध्या पाण्याने धुवा.
Viral Home Remedies : पपईच्या पानांचा रस प्यायल्याने खरंच डेंग्यू बरा होतो? Myth Or Fact
आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही प्रक्रिया केल्याने त्वचेची चमक वाढेल आणि समस्या दूर होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या त्वचेवर काहीही लावण्यापूर्वी त्वचेची संवेदनशीलता तपासा आणि त्याचा जास्त वापर करू नका कारण यामुळे त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो, असं डॉ. चौसे यंनी सांगितलं.