3 महिन्यांत 2 समलैगिंक विवाह प्रकरणं
संबंधित प्रकरण नौगाव तहसील भागातील एका गावाचं आहे. दोन दिवसांपूर्वी या दोन्ही मुली अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबियांनी नौगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर मुलींनी पोलिसांना सांगितलं की, त्या दोघी एकमेकांवर प्रेम करतात आणि एकत्र राहू इच्छितात. छतरपूरमध्ये 3 महिन्यांत समलैंगिक विवाहाची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मार्चमध्ये दौरीया गावातील 23 वर्षीय सोनम यादव आणि आसामची मानसी वर्मन यांनी पोलिसांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्याबाहेर लग्न केलं होतं. त्यावेळीही मुलीने कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं होतं.
advertisement
2 वर्षांपूर्वीच मंदिरात केलं होतं लग्न
21 वर्षीय तरुणीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, ती सज्ञान, सुशिक्षित आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. हे नातं माझ्या इच्छेने आहे. मी माझ्या कुटुंबाला सांगितलं नाही आणि आता माझा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. काही वाद झाल्यास, ती माझी जबाबदारी असेल. कुटुंबीय हे नातं स्वीकारत नसल्यामुळे, आम्ही सुरक्षेसाठी कायदेशीर मार्ग निवडला आहे.
दुसऱ्या तरुणीने सांगितलं की, ती बारावी पास आहे आणि त्यांनी दोन वर्षांपूर्वी 9 डिसेंबर 2023 रोजी एका मंदिराजवळ लग्न केलं होतं. तेव्हापासून त्या आपापल्या घरी राहत होत्या. ती म्हणाली की, आम्ही दोघी सज्ञान आहोत. कुटुंबीय आम्हाला एकत्र राहू देत नाहीत, त्यामुळे आम्ही कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन लग्न केलं. आता आम्ही एकत्रच राहू.
नौगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सतीक सिंह यांनी सांगितलं की, दोन्ही मुली संरक्षणासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. एक दिवसापूर्वी मुलींच्या पालकांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पण आतापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
हे ही वाचा : त्रूटीच त्रूटी! 6000 अपघात, 9000 जणांचा मृत्यू; 'या' कंपनीची विमानं शापित आहेत काय?
हे ही वाचा : PHOTO : समुद्रात जन्मतात, वाढतात अन् मरतात; 'ही' मानवी जमात चुकूनही ठेवत नाही जमिनीवर पाय! मग जगते कशी?