व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतं, फूड ब्लॉगरचा दावा आहे की ती व्यक्ती डिझेलमध्ये पराठे बनवत आहे. फूड ब्लॉगर सांगतो की, लोक इथे मोठ्या उत्साहाने जेवायला येतात. यावर पराठा बनवणारा तरुण म्हणतो की, तुम्हाला खायला मजा आली नाही तर पोलीस ठाण्यात तक्रार करा. पराठा बनवणारा तरुण सांगतो, की तो डिझेलमध्येे पराठा बनवत आहे. गेल्या ३५ वर्षांपासून तो डिझेल पराठा बनवत असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याने आता हे ट्विट डिलीट केलं असून हा पराठा बनवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं आहे
advertisement
व्हिडिओमध्ये तो डिझेल पराठे बनवताना दिसत आहे. तो पराठा पूर्णपणे डिझेलमध्ये तळतो. हा व्हिडिओ X वापरकर्त्याने शेअर केला आहे. व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं, की तो लवकरच फेरारी खरेदी करणार आहे आणि त्याचे ग्राहक लवकरच कर्करोगाच्या उपचारासाठी त्यांची घरे आणि कार विकतील. एका युजरने लिहिलं आहे की, कॅन्सरच्या पराठ्यात केस जाऊ नयेत म्हणून त्याने डोक्यावर टोपी घातली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कारवाईची मागणी केली आहे.