30 वर्षापूर्वी मुलीचा मृत्यू; वडिलांनी आता दिली तिच्या लग्नासाठी जाहिरात, 50 नवरदेवांकडून आला फोन, हैराण करणारं प्रकरण
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
त्यांनी आपल्या 30 वर्ष आधी निधन झालेल्या मुलीच्या लग्नासाठी नवरदेव शोधण्याकरता ही जाहिरात दिली आहे
बंगळुरू : एक अतिशय अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका कुटुंबाने एका लोकल न्यूज पेपरमध्ये एक जाहिरात दिली आहे. यात त्यांनी आपल्या 30 वर्ष आधी निधन झालेल्या मुलीच्या लग्नासाठी नवरदेव शोधण्याकरता ही जाहिरात दिली आहे. ही अजब घटना कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या पुत्तुर येथून समोर आली आहे. इथल्या एका जमातीत मृत अविवाहित मुला-मुलींच्या आत्म्यांचं लग्न करण्याची परंपरा आहे, याला प्रेथा कल्याणम असं म्हटलं जातं.
असं मानलं जातं, की या परंपरेत आत्म्याचं लग्न होतं. तुलुनाडू-दक्षिण कन्नड आणि उडुपी या किनारी जिल्ह्यांमध्ये, प्रेथा कल्याणम नावाने ही प्रथा प्रचलित आहे. खरं तर, स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात होती की, कुलाल जातीच्या आणि बंगेरा गोत्राच्या मुलीसाठी एका मुलाचा शोध घेतला जात आहे, जिचा मृत्यू सुमारे 30 वर्षांपूर्वी झाला होता. या जातीचा कोणी मुलगा असेल, ज्याचा 30 वर्षांपूर्वी मृत्यू झाला असेल आणि कुटुंब प्रेथा कल्याणम करण्यास तयार असेल, तर त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.
advertisement
50 जणांनी कुटुंबाशी संपर्क साधला
ही बाब कोणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केली. दरम्यान, जवळपास 50 जणांनी संपर्क केल्याचं जाहिरात देणाऱ्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं की, सध्या मृत्यूच्या 30 वर्षांनंतर शोभा आणि चंदप्पा यांचा विवाह करण्यात आला. दक्षिण कन्नड जिल्ह्यात हा विवाह सामान्य विवाहाप्रमाणे सर्व प्रथा आणि विधींनी संपन्न होतो. या लग्नात फरक एवढाच होता की शोभा आणि चंदप्पा यांच्या मृत्यूला 30 वर्षे झाली होती.
advertisement
का करतात असं लग्न?
या प्रथेबद्दल जाणकारांनी सांगितलं की, आत्म्यांना मोक्ष मिळावा यासाठी मृत अविवाहित लोकांचा विवाह सोहळा प्रेथा कल्याणम केलं जातं. तुलुनाडू-दक्षिणा कन्नड आणि उडुपी या किनारी जिल्ह्यांमध्ये ही प्रथा मानली जाते. त्यांचा असा विश्वास आहे, की हे विधी पूर्ण केल्याने भावी वधू किंवा वराच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. कारण, विधी 'पितृ आराधना' किंवा पितरांच्या पूजेचा भाग आहे. यात सामान्य विवाहांप्रमाणेच आत्म्यांचे विवाह केले जातात. यामध्ये लग्नाचे ते सर्व विधी केले जातात, ते आपण आताच्या विवाहांमध्ये करतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 14, 2024 10:33 AM IST
मराठी बातम्या/Viral/
30 वर्षापूर्वी मुलीचा मृत्यू; वडिलांनी आता दिली तिच्या लग्नासाठी जाहिरात, 50 नवरदेवांकडून आला फोन, हैराण करणारं प्रकरण