इथे लोकांचं एक होईना, पठ्याचं 20 दिवसांत 2 लग्न; गावात रंगला हाय व्होल्टेज ड्रामा
- Published by:Devika Shinde
- trending desk
Last Updated:
अक्षरा गावातल्या 19 वर्षांच्या विनोद कुमारचा 20 दिवसांपूर्वी 22 एप्रिलला लक्ष्मीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हरला गावात राहणाऱ्या प्रीती कुमारीला भेटायला गेला. तिथल्या ग्रामस्थांनी तरौण गावात दोघांचं लग्न लावलं.
बिहार : बिहारच्या जमुई जिल्ह्याच्या मलयपूर परिसरातल्या एका युवकाने 20 दिवसांत दोन विवाह केले. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रेमविवाह होते. यात फेसबुकवर मैत्री, त्यानंतर प्रेम आणि मग बळजबरीने विवाह अशा पद्धतीनं पहिलं लग्न झालं, तर डीजे वाजवत असताना हा युवक एका युवतीच्या प्रेमात पडला आणि कोर्ट मॅरेज झालं आणि त्याने दुसरा विवाह केला. जमुई जिल्ह्यातल्या मलयपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अक्षरा गावात जेव्हा 19 वर्षांचा युवक 20 दिवसांत दुसऱ्यांदा प्रेमविवाह करून त्याच्या पत्नीसह घरी पोहोचला तेव्हा त्याची पहिली पत्नी तिची सवत पाहून नाराज झाली. त्यानंतर घरात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. पहिल्या पत्नीने घडलेल्या प्रकाराबाबत 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
अक्षरा गावातल्या 19 वर्षांच्या विनोद कुमारचा 20 दिवसांपूर्वी 22 एप्रिलला लक्ष्मीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हरला गावात राहणाऱ्या प्रीती कुमारीला भेटायला गेला. तिथल्या ग्रामस्थांनी तरौण गावात दोघांचं लग्न लावलं. या बळजबरीने लावलेल्या विवाहानंतर प्रीती आणि विनोद पती-पत्नी बनले. विवाहानंतर विनोद पत्नीला घेऊन त्याच्या घरी पोहोचला. या विवाहानंतर 20 दिवसांनी विनोद कुमारने पुन्हा मलयपूरच्या मोसमिया गावातल्या गिरिजा कुमारी नावाच्या युवतीशी दुसरा विवाह केला आणि तिला पत्नी म्हणून घरी आणलं. यामुळे त्याची पहिली पत्नी नाराज झाली आणि तिनं पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर एकच खळबळ उडाली.
advertisement
गावात रंगला हायव्होल्टेज ड्रामा
पोलिसांना माहिती मिळताच मलयूपर पोलीस गावात पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली. पोलीस गावात पोहोचताच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. 'आमचा मुलगा कितीही विवाह करील, त्याने काय फरक पडतो,' असं विनोदचे कुटुंबीय म्हणू लागले. विनोदचं पहिल्यांदा प्रीती कुमारीवर प्रेम जडले. हे दोघं फेसबुकवर भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर विवाह करण्याचा निश्चय करून घरातून पळून गेले; पण ग्रामस्थांनी या दोघांचा मंदिरात विवाह लावून दिला; मात्र यादरम्यान विनोदचं गिरिजा कुमारी नावाच्या युवतीशी प्रेमप्रकरण सुरू होतं.
advertisement
गिरिजा अडकली डीजेवाल्याच्या प्रेमात
गिरिजा कुमारीची गावातल्या एका विवाहसोहळ्यात विनोदशी डीजे वाजवताना ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मी विवाहित आहे, असं विनोदने सांगितल्यावरही गिरिजाने कोणताही आक्षेप न घेता 'मला काही समस्या नाही, मी तुझ्याशी लग्न करीन,' असं सांगितलं. त्यानंतर या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. दुसऱ्या पत्नीने पती आधीच विवाहित असण्यास हरकत नसल्याचं सांगितल्याने प्रकरण जास्त रंजक बनलं.
advertisement
मलयपूर पोलीस कशाची वाट पाहत आहेत?
विनोदची दुसरी पत्नी गिरिजाच्या म्हणण्यानुसार, तिचा पती विवाहित आहे, यावर तिला कोणताही आक्षेप नाही. तिचं त्याच्यावर प्रेम असून, तिला त्याच्यासोबत राहायचं आहे. पहिली पत्नी प्रीती म्हणते, की 'माझं त्याच्यावर प्रेम असताना, तो दुसऱ्या युवतीशी प्रेमविवाह कसा करू शकतो? हे चुकीचं आहे.' या प्रकरणी मलयपूर पोलीस तक्रारीच्या प्रतीक्षेत आहेत, जेणेकरून पुढची कारवाई करता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2024 10:21 PM IST