TRENDING:

डास निवडक लोकांनाच का जास्त चावतात? मिळालं उत्तर, तुम्ही असा करु शकता बचाव

Last Updated:

डेंग्यू-चिकुनगुनियाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अशा वेळी डास टाळणे ही प्रत्येकाची पहिली प्राथमिकता असेल. पण अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की डास काही विशिष्ट लोकांकडे जास्त आकर्षित होतात. यामागे काय कारण आहे? याचे उत्तर एका तज्ज्ञाने दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : देशातील अनेक भागांमध्ये डेंगू-चिकनगुनियाची साथ सुरु आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबलेले असल्याने या आजारांचे धोके वाढतात. अशा वेळी डॉक्टर डासांपासून बचाव करण्याचा सल्ला देतात. मात्र तरीही काही विशिष्ठ लोकांनाच जास्त डास चावतात असं तुम्हीही नोटीस केलं असेल ना. आपल्याला वाटतं की, घाण असल्यामुळे डास असं करतात. पण हे सत्य नाही. यामागे पूर्ण सायन्स आहे. तुम्ही म्हणाल की, डासांना रक्ताची चव ओळखतात. पण असं नाही. रक्ताचा आणि डास जास्त चावण्याचा काहीच संबंध नाही. मग सत्य काय आहे? एका एक्सपर्टने याविषयी संपूर्ण माहिती शेअर केली आहे. ही जाणून तुम्हीही चकीत व्हाल.
एखाद्याला जास्त डास का चावतात?
एखाद्याला जास्त डास का चावतात?
advertisement

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारे त्वचाविज्ञानी लिंडसे झुब्रित्स्की यांनी टिकटॉकवर ही माहिती शेअर केली आहे. डास कोणत्या लोकांकडे जास्त आकर्षित होतात ते सांगितले. पहिले कारण - घाम. मादी डास माणसांचे रक्त शोषून पोट भरतात. पण तिचे आवडते रक्त कोणाचे आहे हे शोधण्यासाठी ती घामाचं साहाय्य घेते. डॉ. झुब्रित्स्की म्हणाले, डास घामाकडे जास्त आकर्षित होतात आणि ज्यांच्या शरीराचे तापमान जास्त असते त्यांच्याकडे आकर्षित होतात. डास विशेषत: अमोनिया, युरिक अॅसिड, लॅक्टिक अॅसिड यासारख्या गोष्टींकडे धावतात. ज्या लोकांच्या शरीरात या रसायनांचे प्रमाण जास्त असते त्यांना डास चावण्याची शक्यता जास्त असते.

advertisement

बीअरप्रेमीही डासांना खूप आवडतात

झुब्रित्स्की यांनी आणखी एक कारण सांगितले. बिअरप्रेमींसाठी ही वाईट बातमी आहे. ते म्हणाले की, इतर गोष्टी ज्या तुम्हाला डास चावण्यास अधिक संवेदनशील बनवू शकतात, ते म्हणजे बिअर पिणे. संशोधनात असे समोर आले आहे की, जो माणूस फक्त 350 मिली बिअरचा कॅन पितो त्याच्या मागे डास धावतात. तिसरे कारण सांगताना झुब्रित्स्की म्हणाले, आपल्या त्वचेवर राहणारे जीवाणूंचे प्रकार आणि संख्या आपल्याला डासांसाठी कमी-अधिक प्रमाणात आकर्षक बनवू शकते. जर आपल्या शरीरावर बॅक्टेरिया जास्त असतील तर डास त्यांच्याकडे जास्त येतात. जसे की आपल्या घोट्यात बॅक्टेरिया होण्याची शक्यता जास्त असते.

advertisement

O रक्तगट असलेल्या लोकांच्या मागे धावणे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. O रक्तगट असलेल्या लोकांचे रक्त इतर रक्तगटांच्या तुलनेत अधिक स्वादिष्ट असते असे डासांना वाटते. म्हणूनच ते O रक्तगट असलेल्या लोकांच्या मागे धावतात. दुसरी गोष्ट, डास कार्बन डायऑक्साइडकडे आकर्षित होतात. तुम्ही जितका जड श्वास घ्याल तितक्या वेगाने डास तुमच्या दिशेने येतील. शेवटी तुमचा शर्ट. तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरून हे ठरवता येते की डास तुम्हाला चावतात की नाही. डास काळ्या आणि हिरव्यासारखे गडद रंग ओळखू शकत नाहीत आणि त्यांच्यावर हल्ला करू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला डास टाळायचे असतील तर पांढऱ्यासारखे हलक्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
डास निवडक लोकांनाच का जास्त चावतात? मिळालं उत्तर, तुम्ही असा करु शकता बचाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल