कुतुबुद्दीन ऐबक कोण होता?
हे जाणून घेण्यासाठी, आम्ही जेव्हा कुतूबमिनारच्या इतिहासाची सविस्तर माहिती घेतली, तेव्हा देशातील इतिहासकार डॉ. विश्वजित कुमार यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की, कुतुबुद्दीन ऐबकने 1199 मध्ये कुतूबमिनारचे काम सुरू केले आणि त्याचे जावई इल्तुतमिश यांनी 1220 मध्ये ते पूर्ण केले. आता प्रश्न असा आहे की, कुतुबुद्दीन ऐबक कोण होता? तर कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीच्या सैन्यात सेनापती होता. कुतुबुद्दीन ऐबकला गुलाम वंशाचा संस्थापक मानले जाते. त्याने दिल्लीत सुलतानशाहीची स्थापना केली. दिल्ली विजयाच्या आनंदात त्याने कुतुबमिनार बांधला. तेव्हापासून आजपर्यंत कुतूबमिनार उभा आहे, पण फक्त तळघरच बांधले गेले होते. त्याच्या मृत्यूनंतर, त्याचा उत्तराधिकारी इल्तुतमिशने आणखी तीन मजले बांधले आणि 1220 मध्ये फिरोज शाह तुघलकने पाचवा आणि शेवटचा मजला बांधला.
advertisement
असा आहे कुतुबमिनार!
डॉ. कुमार यांनी सांगितले की, कुतुबमिनार दक्षिण दिल्लीतील मेहरौली परिसरात आहे. विटांनी बनवलेला हा जगातील सर्वात उंच टॉवर आहे. कुतुबमिनारची उंची 73 मीटर (239.5 फूट) आहे आणि त्याचा व्यास सुमारे 14.3 मीटर आहे. यात सुमारे 379 पायऱ्या आहेत. त्यांनी सांगितले की, 27 किल्ले, मंदिरे तोडून त्यांच्या विटांमधून कुतुबमिनार उभा करण्यात आला आहे. या दगडांवर कुराणमधील श्लोक आणि वेगवेगळी फुले व वेली अतिशय सुंदरपणे कोरलेली आहेत. अलाई दरवाजा, कुव्वत-उल-इस्लाम मशीद, इल्तुतमिश, अलाउद्दीन खिलजी आणि इमाम जमीन यांच्या कबरी, अलाई मिनार आणि सात मीटर उंच लोखंडी खांब देखील या परिसरात आहेत.
हिंदू आणि जैन मंदिरे पाडण्यात आली होती का?
इतिहासकार डॉ. विश्वजित कुमार यांनी सांगितले की, कुव्वत-उल-इस्लाम मशीद कुतुबमिनारच्या ईशान्य दिशेला आहे, जी कुतुबुद्दीन ऐबकने मध्ये बांधली होती. इतिहासाच्या पानांवरून हे स्पष्ट होते की, ती 27 हिंदू आणि जैन मंदिरे पाडून बांधली गेली होती. त्यांनी सांगितले की, कुतुबमिनारच्या आत आणि या मशिदीच्या आसपास तसेच कुतुबमिनारसमोर असलेल्या सर्व ठिकाणांवर, जे आता अवशेष स्वरूपात आहेत, तिथे आजही भगवान गणेश आणि हिंदू धर्माची अनेक चिन्हे स्पष्टपणे दिसतात. हा मुद्दा यापूर्वी अनेक वेळा उपस्थित करण्यात आला आहे आणि आजही यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
हे ही वाचा : 'हा' दिवस आहे खास! शिवलिंगावर अर्पण करा 'या' गोष्टी; शिवशंकराच्या कृपेने व्हाल मालामाल अन् कर्जमुक्त
हे ही वाचा : पैसा टिकत नाही? कामात यश येत नाही? 'या' दिशांमध्ये आहे दोष; त्वरित करा 'हे' उपाय, लगेच दिसेल फरक!