हजारीबाग : पावसाळ्यात अंधाऱ्या, ओलसर, अडगळीच्या जागी विषारी प्राणी आढळतात. त्यामुळे या दिवसांत घरात स्वच्छता ठेवण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. खरंतर पावसाळ्यात सापांचा प्रचंड सुळसुळाट असतो. मात्र तुम्ही एका गोष्टीचं व्यवस्थित निरीक्षण केलं असेल, तर पाऊस संपताच थंडीत साप अगदी दिसेनासे होतात, मग हे साप नेमके जातात तरी कुठे?
जंगल हेच सापाचं घर मानलं जातं. त्यामुळे कितीही धाडसी व्यक्ती असली तरी जंगलात जायचं म्हटलं तरी आता कधीही वाटेत साप येऊ शकतो, हे मनाशी बाळगूनच ती जंगलात जाण्याचं धाडस करते. मात्र हेच जंगलातले विषारी आणि बिनविषारी साप उन्हाळ्यात, पावसाळ्यात मात्र आपल्या घराभोवती घुटमळतात, वेळ पाहून घरातही घुसतात. परंतु थंडीत ते शोधूनही कुठे सापडत नाहीत.
advertisement
कुंडलीत 'कालसर्प दोष' नाही ना? नाहीतर नशिबानं गिळलंच म्हणून समजा! तयारीत राहा
झारखंडच्या हजारीबागेतले सर्पमित्र मुरारी सिंह सांगतात की, साप हा असा प्राणी आहे जो उन्हाळा आणि पावसाळ्यात विशेष सक्रिय असतो. त्यामुळे या दिवसांत लहान, मोठे साप ठिकठिकाणी पाहायला मिळतात. परंतु थंड वारे वाहताच साप निद्रावस्थेत जातात. या स्थितीला Hibernation म्हणतात.
यामध्ये साप शिकारीसाठी अजिबात वणवण भटकत नाही. तो काही खातही नाही. फक्त एका ठिकाणी थांबून स्वतःसाठी आसरा शोधतो आणि तिथंच डोळे बंद करून हळूहळू श्वास घेऊन विश्वांती घेतो. याच स्थितीमुळे त्याला पुढच्या ऋतूंमध्ये सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा मिळते.
शरीर होतं सडपातळ, त्यामुळे सरपटण्याला येतो वेग!
सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साप जवळपास तीन ते चार महिने या शीतनिद्रेत असतात. म्हणूनच त्यासाठी ते अत्यंत सुरक्षित अशी जागा शोधतात. पुढच्या ऋतूत जोमाने शिकार करता यावी याचसाठी ते या दिवसांत शरिरात ऊर्जा साठवून ठेवतात. महत्त्वाचं म्हणजे दिवसेंदिवस काहीच न खाल्ल्यामुळे सापांच्या शरिरातली चरबी कमी होते. शरीर सडपातळ झाल्याने ते आणखी वेगाने सरपटतात. परंतु साप निद्रावस्थेत असतात याचा अर्थ ते गाढ झोपतात असं नाही, तर अधूनमधून ऊन मिळवण्यासाठी ते आपल्या सुरक्षित ठिकाणाहून बाहेर येतात आणि मग पुन्हा जाऊन झोपतात. परंतु आपल्या लक्षात आलंय का, याचाच अर्थ असा आहे की, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात आढळणारे साप अतिशय खतरनाक असतात.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा