TRENDING:

फ्रीजमधील बर्फ पांढरा आणि ग्लेशियरचा निळा असं का? रंगाच्या फरका मागचं कारण काय?

Last Updated:

जर तुम्ही हिमनदीमधील बर्फ पाहिला, ज्याला आपण ग्लेशिअर असं देखील म्हणतो, त्याचा रंग निळा असतो असं का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये हल्ली बर्फ लावतात. कधीकधी हा बर्फ फ्रीजरला आपोआप तयार होतो. त्याचा रंग काय असं विचारलं तर तुम्ही पांढरा असं लगेच उत्तर द्याल. पण तेच जर तुम्ही हिमनदीमधील बर्फ पाहिला, ज्याला आपण ग्लेशिअर असं देखील म्हणतो, त्याचा रंग निळा असतो असं का?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

फ्रीजमध्ये पाणी ठेवल्यास ते गोठल्यानंतर पांढऱ्या बर्फात बदलते. जर आपण यामागील विज्ञानाबद्दल बोललो तर हे घडते कारण जेव्हा पाण्याचे बर्फात रूपांतर होते तेव्हा त्यातील हवा देखील गोठते. जेव्हा प्रकाश त्यावर पडतात तेव्हा गोठलेल्या बर्फाचा रंग आपल्याला पांढरा दिसतो. हे प्रकाशाच्या परावर्तनामुळे घडते.

आता प्रश्न असा पडतो की जेव्हा बर्फ गोठवण्याची प्रक्रिया सारखीच असते, तर मग ग्लेशियरच्या बर्फाचा रंग निळा आणि फ्रीजच्या बर्फाचा रंग पांढरा का? हा रंगातील फरक का?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

अलास्का एज्युकेशन वेबसाइटच्या अहवालानुसार, ग्लेशियर बर्फाचा रंग निळा आहे कारण त्या बर्फामध्ये फक्त पाणी आणि हवा नसते. अनेक वेळा अनेक प्रकारचे रासायनिक घटक त्यात असतात. यासोबतच हिमनदीतील बर्फाचे रेणू एकमेकांत इतके अडकलेले असतात की त्यात हवेची जागा जवळजवळ नसते आणि त्यामुळे जेव्हा त्यावर प्रकाश पडतो तेव्हा हिमनदीचा बर्फ आपल्याला निळा किंवा आकाशी निळा दिसतो. हे केवळ समुद्राच्या बर्फासोबत घडते.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
फ्रीजमधील बर्फ पांढरा आणि ग्लेशियरचा निळा असं का? रंगाच्या फरका मागचं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल