संशय आला आणि वाचले सर्व मेसेज
पत्नीने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. हरिद्वार जिल्ह्यात एका महिलेने तिच्या पतीच्या मोबाईलमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडचे मेसेज पाहिले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिच्या पतीच्या मोबाईलवर सतत मेसेज येत होते. तिला संशय आला की त्याची गर्लफ्रेंड हे करत आहे. त्यानंतर महिलेने त्याच्या गर्लफ्रेंडचे सर्व मेसेज वाचले.
advertisement
पतीने केली जोरदार भांडणं
पती बाथरूममधून बाहेर आल्यावर मेसेज वाचण्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. महिला माहेरी पोहोचली आणि कुटुंबाला या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर महिला कुटुंबासह सासरी पोहोचली. त्यांच्यात जोरदार भांडण झालं. आजूबाजूच्या लोकांनी कसेतरी प्रकरण शांत केलं. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. दुसऱ्या पक्षानेही पोलिसांत तक्रार दिली. गंगनहर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांमध्ये जोरदार गोंधळ झाला. गंगनहर कोतवालीचे उपनिरीक्षक अशोक सिरसवाल यांनी सांगितलं की, दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा : लुडो खेळायला बोलवलं अन् गेम केला, हत्येच्या रात्री माऊलीसोबत काय घडलं?
हे ही वाचा : भावासोबत अफेअरचा संशय, संभाजीनगरमध्ये तरुणीला 3 महिलांकडून बेदम मारहाण
