26 लाख रुपये. इतका तर सामान्यांच्या लग्नाचा खर्चही नसतो, बारशाचाही खर्चही नसेल, उलट या किमतीत एखादं घर येईल. पण इतके पैसे फक्त एक नाव सुचवण्यासाठी घेते ती एक महिला टेलर ए. हम्फ्रे असं तिचं नाव. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणाऱ्या टेलरने मुलांची नावं ठेवणं हा तिचा लक्झरी व्यवसाय बनवला आहे. ज्यासाठी ती लाखो रुपये घेते.
advertisement
बस्सं! आता फक्त 2 तासच वापरता येणार मोबाईल, प्रशासनाचा मोठा निर्णय
टेलरला तिला लहानपणापासूनच वेगवेगळ्या नावांमध्ये रस आहे. तिने हा छंद सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आणि हळूहळू लोकांकडून नावं सुचवण्यासाठी फोन येऊ लागले. नंतर तिने हा बिझनेस सुरू केला. नावं सुचवण्यासाठी पैसे आकारते. 2021 मध्ये, न्यू यॉर्कर मॅगझीनमध्ये तिच्याबद्दल एक लेख प्रकाशित झाला, त्यानंतर तिची मागणी आणखी वाढली. परिणामी तिने तिच्या फीमध्ये अनेक वेळा वाढ केली.
पॅकेजनुसार तिचं शुल्क बदलते. सर्वात मूलभूत पॅकेजची किंमत 200 डॉलर्स म्हणजे अंदाजे 16,000 रुपये, जिथे ती ईमेलद्वारे नावांची यादी पाठवते. सर्वात स्पेशल पॅकेजची किंमत 30,000 डॉलर्स म्हणजे अंदाजे 26.6 लाख रुपये आहे. जिथं ती केवळ नावच नाही तर कुटुंबाची वंशावळ, ब्रँडिंग आणि संपूर्ण नाव संशोधन देखील समाविष्ट करते. तिने 500 हून अधिक बाळांची नावं सुचवली आहेत.
10,00,00,000 रुपयांची सर्जरी! रुग्ण नाही हॉस्पिटल रुग्णाला देणार इतके पैसे, पण का?
न्यू यॉर्क पोस्टनुसार, टेलर म्हणते की अनेक पालक नावं निवडण्याबद्दल खूप भावनिक होतात, त्यांना वाटतं की ते त्यांच्या मुलाच्या ओळखीवर आणि भविष्यावर परिणाम करू शकतात. म्हणून, हे काम कधीकधी अत्यंत महत्त्वाचं बनतं. तिचं काम फक्त नावं निवडण्याबद्दल नाही. कधीकधी, पालक मुलाच्या नावावर असहमत असतात, म्हणून ती मध्यस्थ किंवा सल्लागार म्हणून काम करते.
टेलर कबूल करते की लोक इंटरनेटवर तिची थट्टा करतात. कधीकधी लोक म्हणतात, मुलाचं नाव ठेवण्यासाठी कोणी इतकं पैसे का देईल?" पण ती ते सकारात्मकतेने घेते. ती स्पष्ट करते, "हो, कधीकधी मी नावासाठी पैसे आकारते हे मजेदार वाटतं. पण मला वाटतं की हे काम महत्त्वाचं आहे कारण ते पालकांना योग्य नाव निवडण्यास मदत करते."