जिवंत झिंगा खाणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिला एका रेस्टॉरंटमध्ये आहे. तिच्यासमोर बरेच पदार्थ आहेत. एका भांड्यात खेकडाही दिसत आहे. एका प्लेटमध्ये मोठा झिंगा आहे, जो जिवंत आहे.
advertisement
त्याला ती हातात घेते आणि खेकडा असलेल्या रश्यात सोडायला जाते. पण झिंगा रश्यात पडतच नाही. तो भांड्याबाहेर पडतो. महिला स्टिकने त्याला उचलायला जाते. जशी ती त्याला स्टिकमध्ये पकडते आणि ग्रेव्हीमध्ये टाकायला जातो तोच तो झिंगा उडतो आणि त्या महिलेच्या हातावर पडतो. तसा तो तिच्या हाताला करकचून चावतो.
वेदनेने महिला मोठ्याने ओरडताना दिसते. रेस्टॉरंटचा एक कर्मचारी तिच्या मदतीला धावून येतो. तो तिच्याह हातावरील झिंगा काढण्याचा बराच वेळ प्रयत्न करतो. पण झिंगा महिलेच्या हातावर इतका घट्ट बसतो की त्या कर्मचाऱ्याच्या मदतीनेही तो सुटता सुटत नाही. कसंबसं करून तो महिलेच्या हातावरील झिंगा हटवतो.
@PicturesFoIder एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जिवंत झिंगा खाणाऱ्या महिलेला सगळ्यांनी ट्रोल केलं आहे.