Nano Banana Trend : क्युट तितकाच खतरनाक, 3D Figurine Photo चा सगळ्यात मोठा धोका, फॉलो करताय एकदा वाचाच

Last Updated:
News18
News18
नवी दिल्ली : आता सोशल मीडिया उघडलं की तुम्हाला बरेच थ्रीडी फोटो दिसतील. सध्या तुफान व्हायरल होत असलेला हा नॅनो बनाना ट्रेंड. ज्यामध्ये फोटो थ्रीडी टाइपमध्ये मिळत आहेत. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळे लोक हा ट्रेंड फॉलो करत आहेत. जिबलीनंतर अतिशय क्युट वाटणारा असा हा ट्रेंड. पण तितकाच तो खतरनाक आहे.
काही महिन्यांपूर्वी जसे सर्वजण ChatGPT चा Studio Ghibli ट्रेंड वापरत होते, तसेच आता Google Gemini चा नवीन ट्रेंड, Nano Banana. नॅनो बनाना हे गुगलच्या डीपमाइंड टीमने विकसित केलं आहे. हा ट्रेंड विशेषतः अशा लोकांना आवडतो ज्यांना त्यांचे फोटो मजेदार आणि गोंडस पद्धतीने दाखवायचे आहेत. गुगल जेमिनीचे हे नवीन टूल Gemini 2.5 Flash Image, तुमचा फोटो काही सेकंदात लहान, अत्यंत वास्तववादी 3D आकृत्यांमध्ये रूपांतरित करतं. जे खेळण्यांच्या दुकानात मिळणाऱ्या आकृत्यांसारखे दिसतात.
advertisement
पण ऑनलाईन ट्रेंड म्हटलं की सायबर क्राईमचा धोकाही आलाच.  महाराष्ट्र राज्याच्या सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. धनंजय देशपांडे यांनी याबाबत सावध केलं आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
डॉ. देशपांडे म्हणाले की, जिबलीच्या वेळी मी इशारा दिला होता आणि तेच झालं होतं, अनेकांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. ही वस्तुस्थिती आहे, माझ्याचकडे अनेक केसेस आल्या होत्या. आता तसाच पुन्हा एक ट्रेंड आला आहे, थ्रीडी इफेक्ट. फोटो पाठवला की तुम्हाला पुतळ्यासारखा करून मिळतो आणि शिकलेले, सुशिक्षित लोक या नादात परत अडकत आहेत. तुमचा फोटो पाठवताय, तुम्हाला थ्रीडी इफेक्ट मिळतोय आणि तुम्ही आनंदाने शेअर करताय. याच्यातही तुम्हाला जिबलीसारखाच धोका आहे.
advertisement
डॉ. देशपांडे यांनी यांनी सांगितलं, असे अॅप्स वापरताना ते विविध परमिशन मागतात आणि त्या द्याव्या लागतात. तुम्हाला तुमची गॅलरी द्यावी लागते अॅक्सेस करण्यासाठी थोडक्यात काय तर तुमच्या अकाऊंटताही अॅक्सेस मागितला जातो. तुमचा फोटो दिल्याशिवाय तुम्हाला थ्रीडी इफेक्ट करून मिळणारच नाही. तुमच्या गॅलरीचा एक्सेस जातोय. तुमची गॅलरी अख्खी त्यांच्या ताब्यात आहे.  ज्याने तो अॅप बनवला आहे, त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नसेल पण अॅप बनवणारे आणि तुम्ही यांच्या मधे तुमचा डेटा लिक झाला तर... तिथून फोटो लीक झाला आणि भामट्यांच्या हाती पडला तर मॉर्फिंग करून तुम्हालाच ब्लॅकमेल करून अडकवलं जाऊ शकतं.
advertisement
कृपया याच्या नादी लागू नका. अशा आभासी ट्रेंडमध्ये अडकू नका. सुरक्षित राहा. सावध राहा, असं आवाहन डॉ. देशपांडे यांनी केलं आहे.
मराठी बातम्या/Viral/
Nano Banana Trend : क्युट तितकाच खतरनाक, 3D Figurine Photo चा सगळ्यात मोठा धोका, फॉलो करताय एकदा वाचाच
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement