advertisement

सुरू झालायं काउंटडाउन! रोबोट्सच वर्चस्व, रातोरात म्हातारपण अन् मानवी जीवनाचा... बाबा वेंगांचे भयानक संकेत

Last Updated:

बल्गेरियातील प्रसिद्ध अंध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांनी जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी 2026 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी ज्या काही भयानक घडामोडींचे संकेत दिले आहेत, ते ऐकून आधुनिक विज्ञानाचे दावेही डळमळीत होऊ शकतात.

News18
News18
Baba Vanga Predictions : बल्गेरियातील प्रसिद्ध अंध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांनी जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी 2026 आणि त्यानंतरच्या वर्षांसाठी ज्या काही भयानक घडामोडींचे संकेत दिले आहेत, ते ऐकून आधुनिक विज्ञानाचे दावेही डळमळीत होऊ शकतात. विशेषतः 2026 मध्ये मानवाचा वेगवान म्हातारपणाकडे प्रवास, रोबोट्सचे वाढते वर्चस्व आणि जगाच्या अंताची सुरुवात यावर त्यांनी केलेली भाकिते अत्यंत चिंताजनक आहेत.
मानवाच्या 'अंताचा' काउंटडाऊन सुरू?
बाबा वेंगा यांच्या मते, 2025-2026 हे वर्ष जगाच्या विनाशाच्या सुरुवातीचे वर्ष असू शकते. त्यांच्या मते, मानवी संस्कृतीचा अंत 2025 पासून सुरू होईल आणि 5079 पर्यंत पृथ्वीवरील सर्व जीवन संपलेले असेल. 2026 मध्ये युरोपमधील लोकसंख्या अत्यंत कमी होईल आणि तिथे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमुळे मानवी अस्तित्त्व धोक्यात येईल.
advertisement
नवीन व्हायरस आणि वेगवान वृद्धत्व
बाबा वेंगा यांनी एका अशा विचित्र विषाणूच्या धोक्याबद्दल सांगितले आहे, जो मानवाच्या शरीरावर थेट परिणाम करेल. त्यांच्या भाकितानुसार, एक नवीन आजार येईल ज्यामुळे लोक केवळ काही दिवसांतच वृद्ध दिसू लागतील. हा आजार विज्ञानासाठी एक मोठे कोडे असेल आणि यामुळे मानवाचे सरासरी आयुर्मान अचानक घटू शकते. हा व्हायरस नैसर्गिक असेल की मानवनिर्मित प्रयोगशाळेतून येईल, याबाबत मोठे संभ्रम आहेत.
advertisement
रोबोट्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे नियंत्रण
2026 च्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स तंत्रज्ञान इतके विकसित होईल की ते मानवाच्या हाताबाहेर जाईल. बाबा वेंगा यांनी सूचित केले आहे की, मानवाचे स्वतःच्या तंत्रज्ञानावरचे नियंत्रण सुटेल आणि यंत्रे मानवाचे भवितव्य ठरवू लागतील. हे रोबोट्स युद्धात किंवा जागतिक अर्थव्यवस्थेवर कब्जा मिळवतील, ज्यामुळे मानवी स्वातंत्र्य धोक्यात येईल.
advertisement
एलियन्सचा पृथ्वीशी संपर्क
बाबा वेंगा यांनी 2026 च्या दरम्यान अवकाशातून काही रहस्यमय संदेश किंवा जगाबाहेरील शक्तींच्या आगमनाचे संकेत दिले आहेत. हे आगमन सुखद नसेल. या परग्रहावरील शक्ती पृथ्वीच्या वातावरणात बदल घडवून आणू शकतात किंवा मानवावर आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.
सूर्याचा कोप आणि वैश्विक शक्ती बदल
या काळात सूर्यामध्ये होणाऱ्या मोठ्या बदलांमुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र प्रभावित होऊ शकते. यामुळे इंटरनेट, वीज आणि सर्व प्रकारची दळणवळण यंत्रणा ठप्प होऊ शकते. तसेच, जगातील सत्ता केंद्रात मोठा बदल होईल, जिथे पाश्चात्य राष्ट्रे दुबळी होतील आणि नवीन 'ड्रॅगन' किंवा इतर आशियाई शक्ती जगावर राज्य करतील.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
सुरू झालायं काउंटडाउन! रोबोट्सच वर्चस्व, रातोरात म्हातारपण अन् मानवी जीवनाचा... बाबा वेंगांचे भयानक संकेत
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement