advertisement

शनी आणि 'या' मूलांकाचं असत स्पेशल कनेक्शन, कधीच देत नाही त्रास; तुमचा मूलांक आहे का यात?

Last Updated:

ज्योतिषशास्त्रामध्ये एक असा ग्रह आहे, ज्याचे नाव ऐकून लोकांना अनेकदा भीती वाटते, आणि तो ग्रह म्हणजे रानी. लोकांच्या बाबतीत सहसा असेच घडते. तथापि, शनीदेवाला घाबरण्याची गरज नाही. जर शनीला बारकाईने समजून घेतले, तर गोष्टी अधिक सोप्या आणि वेगळ्या वाटू लागतील.

News18
News18
Shani Favourite Mulank : ज्योतिषशास्त्रामध्ये एक असा ग्रह आहे, ज्याचे नाव ऐकून लोकांना अनेकदा भीती वाटते, आणि तो ग्रह म्हणजे रानी. लोकांच्या बाबतीत सहसा असेच घडते. तथापि, शनीदेवाला घाबरण्याची गरज नाही. जर शनीला बारकाईने समजून घेतले, तर गोष्टी अधिक सोप्या आणि वेगळ्या वाटू लागतील. धर्मग्रंथांमध्ये या ग्रहाला न्यायाचा देव म्हटले आहे, म्हणजेच तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल आणि याची संपूर्ण जबाबदारी शनी घेतो. हा ग्रह लोकांच्या जीवनात शिस्तही आणतो. पण असा एक मूलांक आहे ज्यावर शनीची विशेष कृपा असते. आता हा मूलांक कोणता आणि त्यावर शनीची विशेष कृपा का असते जाणून घेऊ.
कर्मावर विश्वास आणि शनिदेवाची साथ
ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार, प्रत्येक अंकाचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी असतो. यामध्ये 'मूलांक 8' हा अत्यंत शक्तिशाली आणि गहन मानला जातो, कारण या अंकाचा स्वामी खुद्द न्यायदेवता शनिदेव आहेत. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 8 असतो. शनिदेव या लोकांसाठी केवळ मार्गदर्शकच नाहीत, तर त्यांचे संरक्षकही मानले जातात. मूलांक 8 च्या व्यक्ती नशिबापेक्षा 'कर्मावर' जास्त विश्वास ठेवतात, आणि हेच वैशिष्ट्य शनिदेवाला सर्वाधिक प्रिय आहे. शनिदेव कर्माचे फळ देणारे देवता आहेत. जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात, त्यांच्या पाठीशी शनिदेव ढाल बनून उभे राहतात. या तारखांना जन्मलेले लोक सहसा शिस्तप्रिय, गंभीर आणि आपल्या कामाप्रती समर्पित असतात. शनिदेवाच्या कृपेमुळे या लोकांना आयुष्यात कितीही संकटे आली, तरी त्यातून बाहेर पडण्याची अफाट शक्ती मिळते. ते सहजासहजी हार मानत नाहीत, कारण त्यांना शनिदेवाचा 'बॅकिंग' लाभलेला असतो.
advertisement
लेट पण थेट
शनि हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात संथ चालणारा ग्रह आहे. त्याचाच प्रभाव मूलांक 8 च्या लोकांवर दिसून येतो. या लोकांना आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, त्यांना प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो. मात्र, शनिदेवाचा हा एक खास आशीर्वाद आहे की, या लोकांना जे यश मिळते ते 'कायमस्वरूपी' असते. वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या लोकांचा खऱ्या अर्थाने भाग्योदय होतो. एकदा का त्यांनी शिखरावर पाऊल ठेवले, की त्यांना खाली खेचणे कोणालाही शक्य नसते. त्यांची आर्थिक स्थिती देखील हळूहळू पण अत्यंत मजबूत होत जाते.
advertisement
शनिदेवाचा विशेष आशीर्वाद
अनेकांना वाटते की शनिदेव त्रास देतात, पण मूलांक 8 च्या लोकांसाठी शनिदेव एका गुरुप्रमाणे असतात. ते या लोकांना कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यास मदत करतात. या लोकांवर साडेसाती किंवा ढैय्याचा प्रभाव इतरांच्या तुलनेत कमी जाणवतो, कारण ते आधीच शिस्तबद्ध जीवन जगत असतात. त्याच प्रमाणे या मूलांकाच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असल्याने त्यांना एका विशिष्ट वयानंतर प्रत्येक कामात यश मिळते आणि ते कायमस्वरूपी असते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
शनी आणि 'या' मूलांकाचं असत स्पेशल कनेक्शन, कधीच देत नाही त्रास; तुमचा मूलांक आहे का यात?
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement