Astrology: फेब्रुवारीत शनि-सूर्य या राशींची झोळी भरणार; इतक्या दिवसांची मेहनत कामी, लाभाच्या संधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: शनिचा सूर्यावर अधिक प्रभाव पडणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. तिथे शनिदेव आधीच विराजमान आहेत. सूर्य शनिच्या राशीत जाणार आहे त्यामुळे
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा दरमहा राशीत बदल करतो, ज्याचा 12 राशींच्या जीवनात परिणाम दिसतो. दरमहा सूर्याचे राशी परिवर्तन होऊन काही ग्रहांसोबत संयोग जुळून येतो. यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. सूर्याचे फेब्रुवारी महिन्यात शनीबरोबर संयोजन होणार आहे.
शनिचा सूर्यावर अधिक प्रभाव पडणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. तिथे शनिदेव आधीच विराजमान आहेत. सूर्य शनिच्या राशीत जाणार आहे त्यामुळे पिता आणि मुलाचा हा संयोग अनेक राशींचे भाग्य उजळवू शकतो, तर काही राशींना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शनी आणि सूर्य कुंभ राशीत असण्याचा कोणत्या राशींना फायदा होईल, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
सिंह - पहिल्या घराचा स्वामी सूर्य कुंभेत प्रवेश करून या राशीच्या सातव्या घरात असणार आहे. सूर्यासह शनिची कृपा या राशीच्या लोकांवर राहील. या राशीच्या लोकांना नोकरीच्या बर्याच नवीन संधी मिळू शकतात. बर्याच काळानंतर रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. स्वत: मध्ये बरेच बदल पाहाल. स्टॉक मार्केट, ट्रेडद्वारे बराच नफा कमवू शकता. वडिलोपार्जित व्यवसायातही बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल. पण विवाहित जीवनाबद्दल थोडे सावधगिरी बाळगा.
advertisement
धनु - सूर्य हा या राशीच्या नवव्या घराचा स्वामी आहे आणि तो तिसर्या घरात शनीबरोबर येत आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांसाठी ते अनुकूल ठरू शकते. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अफाट यश मिळवू शकतात. या राशीच्या जीवनात सकारात्मक उर्जेचा परिणाम होईल. आयुष्यात पुढे जाण्याच्या बर्याच संधी येऊ शकतात. राजकारण करणार्या लोकांना चांगली गती मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे. पैसे आणि मालमत्ता प्राप्त केली जाऊ शकते. गुंतवणुकीतून बराच परतावा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडू शकतात.
advertisement
कन्या - या राशीमध्ये शनि आणि सूर्याचे संयोजन सहाव्या घरात होणार आहे. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अफाट यश मिळवू शकतात. आपल्या जीवनात विविध पैलूंमध्ये विकास होणार आहे. अध्यात्माकडे आपला कल अधिक असू शकतो. मुलांच्या प्रगतीचे मार्ग उघडू शकतात. जीवनातील अडचणी दूर होतील. यासह लव्ह लाइफ चांगले असेल. मनाप्रमाणे लग्न देखील करू शकता. परंतु आरोग्याबद्दल थोडे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2025 7:37 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astrology: फेब्रुवारीत शनि-सूर्य या राशींची झोळी भरणार; इतक्या दिवसांची मेहनत कामी, लाभाच्या संधी








