advertisement

Chandra Grahan: कोणतं दिसणार, कोणतं नाही दिसणार? 2034 सालापर्यंतच्या चंद्रग्रहणांची सविस्तर यादी पाहा

Last Updated:

Chandra Grahan 2026: जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा ‘छायाकल्प चंद्रग्रहण‘ दिसते. जेव्हा चंद्राचा थोडा भाग पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो, तेव्हा ‘खंडग्रास चंद्रग्रहण‘ दिसते.

News18
News18
मुंबई : यंदा धूलिवंदन दिवशी चंद्रग्रहण होणार असल्यानं सर्वांना उत्सुकता लागली आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी 3 ते 5 मिनिट चंद्रग्रहण पाहता येईल ते मुंबईसह महाराष्ट्रात दिसणार आहे. ग्रहण दिसणार असल्याने त्याविषयी विविध चर्चा सुरू आहेत. काही लोक यासंबधी धार्मिक नियम पाळतात. पण कोणत्याही अंधश्रद्धा पाळू नयेत असे ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ सोमण यांनी सांगितले आहे. यासह चंद्रग्रहणासह येथून पुढे 2034 पर्यंत कधी-कधी चंद्रग्रहण लागणार आहे आणि कोणते दिसेल, कोणते दिसणार नाही, याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्ट करून दिली आहे.
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छाये भोवतालच्या विरळ छायेत येतो, तेव्हा ‘छायाकल्प चंद्रग्रहण‘ दिसते. जेव्हा चंद्राचा थोडा भाग पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येतो, तेव्हा ‘खंडग्रास चंद्रग्रहण‘ दिसते. जेव्हा संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेमध्ये येते तेव्हा ‘खग्रास चंद्रग्रहण‘ दिसते. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण हे नैसर्गिक आविष्कार आहेत. कोणत्याही अंधश्रद्धांना अजिबात घाबरू नका. ग्रहणाचे योग्य प्रकारे निरिक्षण करा. त्यामागचे विज्ञान समजून घ्या. ग्रहणात हवा दूषित होत नाही, असेही ते म्हणाले.
advertisement
इथून पुढे 2034 सालापर्यंत होणारी चंद्रग्रहणे -
(1)खग्रास चंद्रग्रहण - 3 मार्च 2026 - भारतात ग्रहणातच चंद्र उगवेल.
(2)खंडग्रास चंद्रग्रहण - 28 ॲागस्ट 2026 - भारतातून दिसणार नाही.
(3)छायाकल्प चंद्रग्रहण - 20 फेब्रुवारी 2027 - भारतातून दिसेल.
(4)छायाकल्प चंद्रग्रहण - 18 जुलै 2027 - भारतातून दिसेल.
(5)छायाकल्प चंद्रग्रहण - 17 ॲागस्ट 2027 - भारतातून दिसणार नाही.
advertisement
(6)खंडग्रास चंद्रग्रहण - 12 जानेवारी 2028 - भारतातून दिसणार नाही.
(7)खंडग्रास चंद्रग्रहण - 6 जुलै 2028 - भारतातून दिसेल.
(8) खग्रास चंद्रग्रहण - 31 डिसेंबर 2028 - भारतातून दिसेल.
(9)खग्रास चंद्रग्रहण - 28 जून 2029 - भारतातून दिसणार नाही.
(10)खग्रास चंद्रग्रहण - 20 डिसेंबर 2029 - भारतातून दिसेल.
(11)खंडग्रास चंद्रग्रहण - 15 जून 2030 - भारतातून दिसेल.
advertisement
(12)छायाकल्प चंद्रग्रहण - 9 डिसेंबर 2030 - भारतातून दिसेल.
(13)छायाकल्प चंद्रग्रहण - 7 मे 2031 - भारतातून दिसणार नाही.
(14)छायाकल्प चंद्रग्रहण - 5 जून 2031 - भारतातून दिसणार नाही.
(15)छायाकल्प चंद्रग्रहण - 30 ॲाक्टोबर 2031 - भारतातून दिसणार नाही.
(16)खग्रास चंद्रग्रहण - 25 एप्रिल 2032 - भारतातून दिसेल.
(17)खग्रास चंद्रग्रहण - 18 ॲाक्टोबर 2032 - भारतातून दिसेल.
advertisement
(18)खग्रास चंद्रग्रहण - 14 एप्रिल 2033 - भारतातून दिसेल.
(19)खग्रास चंद्रग्रहण - 8 ॲाक्टोबर 2033 - भारतातून दिसेल.
(20) छायाकल्प चंद्रग्रहण- 3 एप्रिल 2034 - भारतातून दिसेल.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Chandra Grahan: कोणतं दिसणार, कोणतं नाही दिसणार? 2034 सालापर्यंतच्या चंद्रग्रहणांची सविस्तर यादी पाहा
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement