Best CNG Cars: फॅमिलीसाठी बेस्ट अशा CNG कार, मायलेज 34 किमी आणि किंमतही 7 लाखांच्या आत!
- Published by:sachin Salve
Last Updated:
सध्या सर्वत्र EV गाड्यांचा बोलबाला पाहण्यास मिळत आहे. पण अजूनही लांबपल्याच्या प्रवासासाठी डिझेल आणि सीएनजी गाड्यांची पहिली पसंती आहे.
मुंबई : भारतात सध्या ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल पाहण्यास मिळत आहे. सध्या सर्वत्र EV गाड्यांचा बोलबाला पाहण्यास मिळत आहे. पण अजूनही लांबपल्याच्या प्रवासासाठी डिझेल आणि सीएनजी गाड्यांची पहिली पसंती आहे. जे लोक दररोज ५० किमी किंवा त्याहून अधिक अंतर प्रवास करतात, त्यांच्यासाठी सीएनजी कार हा एकमेव पर्याय उरतो. सध्या भारतात सीएनजी कारचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, चांगले मायलेज देणाऱ्या कार कोणत्या आहे आणि बजेटमध्ये बसतील याची माहिती सर्वांनाच माहिती असते असं नाही.
27 किमी मायलेज देणारी टाटा टियागो
आयसीएनजी टाटा टियागो सीएनजी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. इंजिनबद्दल बोलायचं झालं तर, या कारमध्ये १.२ लिटर इंजिन आहे जे सीएनजी मोडमध्ये ७३ एचपी पॉवर आणि ९५ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे. ही कार २७ किमी/किलो मायलेज देते. या कारची किंमत ५.६५ लाख रुपयांपासून सुरू होते. मारुतीच्या सीएनजी कारच्या तुलनेत हे कमी मायलेज देते. पण ते अधिक सुरक्षितता आणि ताकद देते.
advertisement
मारुती सेलेरियो 34 किमी मायलेज
देशातील आघाडी आणि सर्वात जास्त कार विक्री करणारी मारुती सुझुकीची सेलेरियो सीएनजी ही एक प्रवासासाठी उत्तम कार आहे. . ही कार १.० लिटर पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे. या कारचं इंजिन देखील चांगली कामगिरी देते. ही कार सीएनजी मोडवर ३४.४३ किमी/किलो मायलेज देते. कारमध्ये ५ लोक सहज बसू शकतात. सुरक्षेसाठी, या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्जची सुविधा आहे. सेलेरियो सीएनजीची एक्स-शोरूम किंमत ५.६४ लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
मारुती WagonR CNG 34 किमी मायलेज
मारुती सुझुकीची वॅगन-आर सीएनजी ही आज प्रत्येक घराची पसंती आहे. या कारमध्ये जितकी जागा उपलब्ध आहे तितकी जागा इतर कोणत्याही कारमध्ये उपलब्ध नाही. ५ लोक या कारमध्ये खूप आरामात बसू शकतात. वॅगन-आर मध्ये १.० लिटर पेट्रोल इंजिन आहे आणि ही कार सीएनजीमध्ये देखील उपलब्ध आहे. सीएनजीमध्ये कारचं मायलेज ३४ किमी/किलो आहे. सुरक्षेसाठी, कारमध्ये EBD आणि एअरबॅग्जसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे. वॅगन-आर दैनंदिन वापरासाठी वापरण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. वॅगन-आर ची किंमत ६.५४ लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2025 11:35 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Best CNG Cars: फॅमिलीसाठी बेस्ट अशा CNG कार, मायलेज 34 किमी आणि किंमतही 7 लाखांच्या आत!









