Tata ची टँकसारखी कार 31 मार्चच्याआधीच बूक करा! 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल, यादी समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
त्यामुळे जर तुम्ही टाटाची कार खरेदी कऱण्याचा प्लॅन करत असाल ३१ मार्चच्या आधी कार बूक करणे हे फायद्याचं ठरणार आहे.
मुंबई: जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे एकीकडे स्वस्ताईची लाट आली होती. कारच्या किंमतीत एसयूव्ही मार्केटमध्ये सहज उपलब्ध झाल्या आहेत. पण आता चालू आर्थिक वर्षाचा मार्च अखेर होत आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून अनेक गोष्टी महागणार आहे. त्यामध्ये आता टाटा मोटर्सने ही वाहनांच्या किंमतीत १ एप्रिलपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टाटाची कार घेणाऱ्यांंच्या खिश्यावर आता भार पडला आहे.
आखाती देशामध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. तर दुसरीकडे आता कच्चा मालही महागला आहे. त्यामुळे आता कारच्या किंमतीत वाढ होणार आहे. उत्पादन आणि दर्जा कायम राखण्यासाठी वाहनांच्या किंमतीत वाढ करावा लागणार आहे, असं टाटा मोटर्सकडून सांगण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही टाटाची कार खरेदी कऱण्याचा प्लॅन करत असाल ३१ मार्चच्या आधी कार बूक करणे हे फायद्याचं ठरणार आहे.
advertisement
नेमका काय आहे निर्णय
टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ०.५ टक्के इतकी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटाच्या सगळ्याच गाड्यांच्या किंमतीमध्ये फरक जाणवणार आहे.
| कारचं नाव | सेगमेंट | इंधन प्रकार | सुरुवाती किंमत |
|---|---|---|---|
| Tata Tiago | हॅचबॅक | पेट्रोल / CNG | 4.5 लाखांपासून |
| Tata Tigor | सेडान | पेट्रोल / CNG | ₹5.4 लाखांपासून |
| Tata Altroz | प्रीमियम हॅचबॅक | पेट्रोल / डिझेल / CNG | ₹6.3 लाखांपासून |
| Tata Punch | मायक्रो SUV | पेट्रोल / CNG | ₹5.5 लाखांपासून |
| Tata Nexon | कॉम्पॅक्ट SUV | पेट्रोल / डिझेल | ₹7.3 लाखांपासून |
| Tata Harrier | मिड-साइज SUV | डिझेल | ₹12.8 लाखांपासून |
| Tata Safari | फुल-साइज SUV | डिझेल | ₹13.2 लाखांपासून |
| Tata Curvv ICE | कूपे SUV | पेट्रोल / डिझेल | ₹9.9 लाखांपासून |
advertisement
किती वाढणार किंमत?
टाटा मोटर्सच्या ICE अर्थात पेट्रोल-डिझेल कारच्या किंमतीत सरासरी 0.5 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. पण या किंमतीत व्हेरियंट आणि मॉडेलवर सुद्धा किंमती अवलंबून असणार आहे .
कोणत्या गाड्यांच्या किंमतीवर बसणार फरक
टाटा मोटर्सच्या फक्त ICE मॉडल्सच्या कारच्या किंमतीत दरवाढ होणार आहे. यामध्ये टाटा मोटर्सच्या Tata Tigor,
Tata Altroz, Tata Punch. Tata Nexon, Tata Harrier, Tata Safari आणि Tata Curvv ICE या गाड्यांचा समावेश असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 7:56 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Tata ची टँकसारखी कार 31 मार्चच्याआधीच बूक करा! 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल, यादी समोर









