advertisement

FasTag : कार विकल्यावर FasTag सुद्धा ट्रान्सफर करावा लागतो का? काय सांगतो नियम

Last Updated:

फास्टॅगशिवाय तुम्ही गाडी चालवू शकत नाही. पण जर तुम्ही तुमची जुनी गाडी विकत असाल तर फास्टॅग देखील ट्रान्सफर करावा लागेल का?

(फास्ट टॅग)
(फास्ट टॅग)
मुंबई :  टोल नाक्यावर वाहतूक कोंडीत न अडकता सुसाट जाण्यासाठी फास्ट टॅग आणण्यात आले आहे. फास्ट टॅगमध्ये काहींना काही नियम बदलत असतात. टोल टॅक्स भरण्यासाठी सर्व वाहनांमध्ये फास्ट टॅगचा वापर केला जातो. प्रत्येक वाहनाच्या काचेवर फास्टॅग चिप स्टिकर लावला जातो. आजकाल सर्व बँका फास्टॅग जारी करतात. नवीन गाडीसोबत तुम्हाला फास्टॅग देखील घ्यावा लागेल. फास्टॅगशिवाय तुम्ही गाडी चालवू शकत नाही. पण जर तुम्ही तुमची जुनी गाडी विकत असाल तर फास्टॅग देखील ट्रान्सफर करावा लागेल का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
फास्ट टॅग तुमच्या बँक खात्याशी जोडलेला आहे म्हणून जेव्हा तुम्ही तुमची कार विकता, तेव्हा तुम्हाला त्या वाहनाशी जोडलेला फास्ट टॅग काढून घ्यावा लागतो.  कारण तो ट्रान्सफर होत नाही. फास्ट टॅग बंद करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बँकेत जावं लागेल किंवा कस्टमर केअरशी बोलून तो बंद करावा लागेल. 
advertisement
एवढेच नाही जर तुमचा फास्ट टॅग खराब झाला किंवा हरवला तर, तरीही तुम्हाला पुन्हा बँकेशी संपर्क साधावा लागेल आणि नवीन फास्ट टॅगबद्दल अर्ज करावा लागेल. पुन्हा नवीन फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला एक निश्चित शुल्क भरावे लागेल. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून एक नवीन फास्टॅग मिळेल.
advertisement
पण नवीन फास्ट टॅग थेट तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर येईल. जर तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असाल तर तुम्हाला फास्टॅग सोबत ठेवावा लागेल अन्यथा तुम्हाला अनेक ठिकाणी दुप्पट टोल भरावा लागू शकतो आणि तुमचा प्रवास महाग होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
FasTag : कार विकल्यावर FasTag सुद्धा ट्रान्सफर करावा लागतो का? काय सांगतो नियम
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement