advertisement

Maruti ने अखेर पत्ते उघडले, Tata आणि Mahindra ला भिडणार; पहिल्या EV SUV ची किंमत जाहीर

Last Updated:

डिसेंबर 2025 मध्ये लाँच करण्यात आली होती. या Maruti e Vitara लाँच करून मारुतीने ईव्ही मार्केटमध्ये पाऊल ठेवलं होतं.

News18
News18
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही अलीकडेच लाँच केली आहे.  Maruti e Vitara असं या एसयूव्हीचं नाव देण्यात आलं आहे. Maruti e Vitara लाँच तर झाली पण किंमत आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. पण, आता Maruti e Vitara च्या मॉडेलची किंमत जाहीर केली आहे. त्यामुळे आता टाटा मोटर्स आणि महिंद्रा मोटर्सला थेट चॅलेंज देणार आहे.
Maruti e Vitara ची सुरुवाती  किंमत १०.९९ लाखांपासून सुरू केली आहे. ही किंमत  Battery-as-a-Service (BaaS) व्हेरियंटवर ठरवण्यात आली आहे. म्हणजे, गाडीची किंमत वेगळी असणार आहे आणि बॅटरीची किंमत वेगळी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना बॅटरीसाठी कंपनी ही  3.99 रुपये प्रति किलोमीटर चार्ज करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Maruti e Vitara ही मारुतीची पहिली EV   
मारुती सुझुकीची Maruti e Vitara ही पहिली वहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.  डिसेंबर 2025 मध्ये लाँच करण्यात आली होती. या Maruti e Vitara लाँच करून मारुतीने ईव्ही मार्केटमध्ये पाऊल ठेवलं होतं. या एसयूव्हीची बुकिंग जानेवारी २०२६ पासून सुरू होणार होती. पण किंमत जाहीर न केल्यामुळे हे थांबवण्यात आलं होतं. दरम्यान, मारुती सुझुकीने Maruti e Vitara चं प्रोडक्शन आधीच सुरू केला आहे. २०२५ च्या अखेरीपर्यंत जवळपास 13,000 यूनिट्स हे 28 देशांमध्ये निर्यात करण्यात आले आहे. Maruti e Vitara ही सुझुकी आणि टोयोटाच्या ग्लोबल भागीदारीअंतर्गत तयार करण्यात आली आहे.
advertisement
Maruti e Vitara ची रेंज किती?
Maruti e Vitara एकदा पूर्ण चार्ज केल्यावर  543 किलोमीटर इतकी रेंज देईल असा दावा कंपनीने केला आहे. मारुतीने Maruti e Vitara मध्ये  Delta, Zeta आणि Alpha व्हेरियंट्स आणले आहे. यामध्ये २ बॅटरी पर्याय दिले आहे एक 49 kWh आणि दुसरा 61 kWh. Delta व्हेरियंटमध्ये छोटी बॅटरी दिली आहे. तर मोठ्या व्हेरियंट्समध्ये मोठी बॅटरी दिली आहे.
advertisement
चार्जिंग सेंटरची तयारी
मारुतीचं देशभरात सगळ्यात मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे मारुतीने सर्वात आधी चार्जिंग स्टेशन तयार करण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत देशभरात  1,100 शहरांमध्ये 2,000 पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट उभारले आहे.  यामध्ये EV  गाड्यांचा सगळ्यात जास्त वापर असलेल्या टॉप 100 शहरांचा समावेश आहे. एवढंच नाहीतर  कंपनीने 13 प्रमुख चार्जिंग ऑपरेटर्ससोबत भागिदारीही केली आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Maruti ने अखेर पत्ते उघडले, Tata आणि Mahindra ला भिडणार; पहिल्या EV SUV ची किंमत जाहीर
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement