Maruti लवकरच करणार धमाका, BMW सारखी दिसणारी कार करतेय लाँच!
- Published by:sachin Salve
Last Updated:
मारुती डिझायरच्या न्यू जनरेशन मॉडेलच्या पॉवरट्रेनमध्ये बदल केलाय. नवीन स्विफ्टप्रमाणे ही कार Z-सिरीज, 3-सिलेंडर इंजिनने सुसज्ज असू शकते.
कार खरेदी करण्याचे स्वप्न अनेकांचे असते. त्यासाठी अनेकजण पैशांची बचत करीत असतात. तुमचाही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी त्यांच्या एका लोकप्रिय कारचे न्यू जनरेशन मॉडेल 11 नोव्हेंबर 2024 ला लाँच करीत आहे. सोशल मीडियावर या नवीन कारचा फोटोही व्हायरल होतोय.
मारुती सुझुकी कंपनी भारतातील सर्वात लोकप्रिय कार असलेली डिझायरचं ‘न्यू जनरेशन मॉडेल’ लाँच करणार आहे. भारतात ही कार 11 नोव्हेंबर 2024 ला लाँच होईल. सोशल मीडियावर या कारचा फोटो लीक झाला असून त्यावरून गाडीच्या नव्या लूक आणि स्टाइलचा अंदाज येतोय. डिझायरचं हे न्यू जनरेशन मॉडेल जुन्या कारपेक्षा खूपच वेगळं आहे. ही कार नवीन डिझाइनसह भारतात लाँच केली जाणार आहे.
advertisement

(मारुती स्विफ्ट डिझायर 2024)
असे आहे कारचे इंजिन
मारुती डिझायरच्या न्यू जनरेशन मॉडेलच्या पॉवरट्रेनमध्ये बदल केलाय. नवीन स्विफ्टप्रमाणे ही कार Z-सिरीज, 3-सिलेंडर इंजिनने सुसज्ज असू शकते. या इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शनही दिला जाईल. कारच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स दिला जाईल. मारुतीचे हे नवीन मॉडेल विक्रीत लक्षणीय वाढ करू शकते.
advertisement
डिझायरचं इंटिरिअर कसं असेल?
नवीन मारुती डिझायरचं इंटिरिअर बऱ्याच प्रमाणात स्विफ्टसारखे असेल. पण ऑटोमेकर ही नवीन कार वेगळ्या रंगांमध्ये लाँच करू शकते. या कारमध्ये मिळणारी टचस्क्रीन स्विफ्टसारखी असू शकते. पण या कारचे सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे सनरूफ. सध्याच्या डिझायरमध्ये हे फीचर उपलब्ध नाही. भारतीय ऑटो मार्केटमध्ये कोणत्याही कॉम्पॅक्ट सेडानमध्ये सनरूफचं फीचर अद्याप आलेलं नाही. या गाडीतील सर्व फीचर्सची माहिती लाँचिंगच्या वेळी समोर येईल.
advertisement
कसं असेल डिझाइन?
मारुती डिझायरचा लीक झालेला फोटो पाहिल्यानंतर ही कार पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम असल्याचं दिसून येत आहे. कारला स्लिम हेडलॅम्प बसवून ते क्रोम लाइननं जोडले जाऊ शकतात. मारुतीची ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा मोठ्या ग्रीलसह मिळेल. कारची लांबी पूर्वीप्रमाणे चार मीटरच्या रेंजमध्ये असू शकते. वाहनाच्या मागील बाजूस एक मोठी क्रोम लाइन देखील लावली जाऊ शकते, जी टेल लॅम्पशी जोडली जाईल.
advertisement
तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी मारूती डिझायरचं न्यू जनरेशन कार उत्तम ऑप्शन ठरू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2024 11:45 PM IST