BMW ची दुर्मिळ R25! भारतात फक्त दोन गाड्या, त्यापैकी एक कोल्हापूरकराची..!
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vintage Bike: आजपर्यंत आपण बीएमडब्ल्यू कंपनीच्या अनेक लक्झरीयस कार बद्दल ऐकलं आहे. मात्र बीएमडब्ल्यू सुरुवातीच्या काळात मोटरसायकलही बनवत होती.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नसतं, असं म्हटलं जातं. आपल्या छंदासाठी किंवा हौसेसाठी कोल्हापूरकर कितीही किंमत मोजायला तयार होतात. याच कोल्हापुरात विंटेज वाहनांच्या चाहतेची मोठे आहेत. अगदी दूर्मिळ अशा गाड्या कोल्हापुरात पाहायला मिळतात. अशीच एक विंटेज बाईक सध्या चर्चेचा विषय ठरतेय. ही दुचाकी बीएमडब्ल्यू या प्रसिद्ध कंपनीची असून भारतात या कंपनीच्या आर-25 या मॉडेलच्या फक्त दोनच गाड्या आहेत. यातील एक कोल्हापूरकराकडं आहे. याबाबतच आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
बीएमडब्ल्यू या कंपनीचे नाव लक्झरीयस कार बनवण्यासाठी ओळखलं जातं. सर्वात जास्त लक्झरीयस कार याच कंपनीच्या खरेदी केल्या जातात. खरंतर बीएमडब्ल्यू ही कंपनी पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान स्थापन झालेली. त्याची स्थापना ही फायटर विमानांच्या इंजिन बनवण्यासाठी केली गेली होती. त्यानंतर कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात पाऊल ठेवलं. आजपर्यंत आपण बीएमडब्ल्यू कंपनीच्या अनेक लक्झरीयस कार बद्दल ऐकलं आहे. मात्र बीएमडब्ल्यू सुरुवातीच्या काळात मोटरसायकल ही बनवत होती.
advertisement
1923 मध्ये बीएमडब्ल्यू ने मोटरसायकल आणि 1928 मध्ये कार्सचं उत्पादन सुरू केलं. आज आपण बीएमडब्ल्यू ने बनवलेल्या पहिल्या बाईकचे माहिती करून घेणार आहोत. विशेष म्हणजे या बीएमडब्ल्यूची बाईक्स जगामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच राहिल्या आहेत. त्यापैकी BMW R25 या गाड्या भारतात दोन आहेत आणि या दोन पैकी एक बाईक ही कोल्हापूरकराच्या नावावर आहे.
advertisement
कशी आहे BMW R25?
BMW R25 ही BMW कंपनीने 1950 च्या दशकात तयार केलेली एकल सिलिंडर इंजिन असलेली मोटारबाईक आहे. या बाईकचे उत्पादन 1950 च्या दशकात सुरू झाले आणि 1957 पर्यंत चालू राहिले. या बाईकची वैशिष्ट्ये म्हणजे सरळ रेषेत ठेवलेले एकल सिलिंडर इंजिन, फिशर सायलेन्सर आणि रुबाबदार डिझाइन. भारतात BMW R25 बाईकचr केवळ दोनच उदाहरणे आहेत, आणि त्यापैकी एक कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमधील ही बाईक 1957 च्या मॉडेलची आहे. BMW R25 ही बाईक तिच्या काळातील तंत्रज्ञान आणि डिझाइनसाठी ओळखली जाते, आणि तिच्या दुर्मिळतेमुळे ती मोटरसायकल प्रेमींमध्ये विशेष प्रिय आहे.
advertisement
BMW R25 ची वैशिष्ट्ये
- BMW R25 मध्ये एक 247cc, सिंगल सिलिंडर, 4-स्ट्रोक इंजिन आहे.
- हे इंजिन साधारणतः 12 हॉर्सपावर (hp) तयार करते, ज्यामुळे ही गाडी साधारणतः 90-100 किमी/तास चा वेग मिळवू शकते.
- R25 ची डिझाइन साधी आणि क्लासिक आहे, ज्यामध्ये सपाट टाकी आणि साइड कारसाठी कनेक्शन असलेला फ्रेम असतो.
advertisement
- गाडीचे डिझाइन सर्वाधिक काळजीपूर्वक आणि यांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट होते.
- BMW R25 मध्ये फ्रंटमध्ये सस्पेंशन आर्म आणि मागील बाजूस सस्पेंशनसाठी ट्विन शॉक ऑब्जर्व्हर वापरण्यात आले आहेत.
- यात ड्रम ब्रेक्स आहेत, जी त्या काळात अगदी क्वचीतच होती.
- BMW R25 चा वजन साधारणपणे 160 किलोग्रॅम आहे, ज्यामुळे ही गाडी हलकी आणि सहज हाताळता येणारी आहे.
advertisement
- R25 साधारणपणे 40-45 किमी/लिटर पर्यंत मायलेज देऊ शकते, जो त्या काळात चांगला मानला जात होता.
- या गाडीमध्ये दोन रंगांचे पर्याय होते, काळा आणि सिल्व्हर.
- BMW R25 ला त्याच्या साधेपणामुळे आणि उत्तम दर्जाच्या इंजिन तंत्रज्ञानामुळे मोठं नाव मिळालं.
- BMW R25 एक क्लासिक मोटरसायकल म्हणून ओळख होती. भारतात फक्त दोनच BMW R25 गाड्या अस्तित्वात आहेत आणि यामुळे तिचे महत्व अधिकच आहे. कोल्हापुरात R25 असल्याने ही गाडी महत्वपूर्ण मानली जाते.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Feb 12, 2025 10:16 AM IST









